नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. तसेच त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही मदत करते. खोबऱ्याच्या तेलाचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर त्वचेच्या समस्या, डर्मेटाइटिस, एक्जिमा आणि स्किन बर्नमध्ये करण्यात येतो.
खोबऱ्याचं तेल स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठी मदत करते आणि ओठ गुलाबी आणि मॉयश्चराइज्ड करण्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे नियमितपणे याचा वापर केल्याने स्ट्रेच मार्क्सपासून सुटका मिळवण्यासाठी आणि ओठांसाठीही फायदेशीर ठरते. खोबऱ्याचं तेल केसांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करते. केस लांब आणि चमकदार करण्यासाठी खोबऱ्याचे तेलं अत्यंत गुणकारी असते. खोबऱ्याच्या तेलाने किंवा नारळाच्या तेलाने 5 मिनिटांसाठी डोक्याला मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
तसेच केसांच्या मुळांना मजबूत करण्यासही फायदेशीर ठरते. नियमितपणे खोबऱ्याच्या तेलाने केसांना मसाज केल्याने केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते. खोबऱ्याचे तेल तोंडाचे आरोग्य उत्तम राखण्यासही मदत करते. साधारणतः 20 मिनिटांसाठी खोबऱ्याचे तेल तोंडात ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने चूळ भरा. तोंडाला येणारी दुर्गंधी आणि हिरड्यांच्या समस्या दूर होतील. हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा असे करणे फायदेशीर ठरते.
आयुर्वेदातही नारळाचे किंवा खोबऱ्याच्या तेलाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. अशातच शरीराला आलेली सूज, सांधेदुखीवर उपया म्हणून खोबऱ्याच्या तेलाचा वापर करण्यात येतो. हे तेल हाडांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ऑब्जर्व करण्याच्या क्षमता सुधारण्यासाठी मदत करतात. खोबऱ्याच्या तेलाचा वापर वजन कमी करण्यासाठीही करण्यात येतो. ताज्या नारळातून काढलेल्या तेलामध्ये इतर नारळांच्या तेलांपेक्षा जास्त मीडियम चेन फॅटी अॅसिड्स (70 ते 80 टक्के) असतात. हे वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
Published on: 02 September 2020, 01:59 IST