Health

आपल्याला शाळेत आठवी, नववी मध्ये शरीर शास्त्रात शिकवले आहे

Updated on 24 May, 2022 2:00 PM IST

आपल्या पोटात मराठीत जठर, यकृत म्हणजे लिव्हर, प्लिहा, स्वादुपिंड, लहान आंतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे.आता विचार करा. देवाने, निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व २२ फूटाचे आतडे कसे बसविले असेल? २२ फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!एक दिवस एक फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो, प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व  न पचलेले अन्न शरीरा बाहेर, पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. 

म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते.

ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लँडला व स्रियांना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो.दीवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी १० ते १२ सूर्यनमस्कार घातले, तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा अनुभव आहे.आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो, प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर, पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे.

सूर्यनमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते.दररोज १२ ते १५ सूर्यनमस्कार घालायला १० ते १५ मिनीटे लागतात. सुर्योपासनाही होते. घरी करणे असल्याने  जीमची फी व जाण्या-येण्याचा वेळ आणि खर्चही वाचतो.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लँडला व स्रियांना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो.

English Summary: Why Surya Namaskar? So let's see what exactly happens
Published on: 24 May 2022, 02:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)