लहानपणी आपली आई आपल्याला दूध पिण्याची सक्ती करायची. त्याला कारण पण तसंच असायचं. दुधाला संपूर्ण अन्नाची उपमा दिली जाते. कारण त्यात जवळजवळ सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. म्हणूनच आरोग्य तज्ञ देखील उत्तम आरोग्यासाठी दुधाचे सेवन करण्याची शिफारस करतात.
दुधाचा वापर अनेक प्रकारे केला जातो, बऱ्याच जणांना दूध प्येय पदार्थ म्हणून आवडत नसले तरी दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचा मात्र आवडीने आस्वाद घेतात.
दुधाचे सेवन नक्की कसे करावे उकळलेले कि कच्चेच?-
अनेकजण आपल्याला कच्चे दूध पिण्यास नकार देतात. दूध उकळूनच पिले पाहिजे असं वारंवार सांगितात. त्यामुळे बऱ्याचदा हा वाद निर्माण होतो की दूध नक्की कच्चे प्यावे की उकळून? चला तर मग आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला या सत्याची ओळख करून देणार आहोत.
कच्चे दूध प्यावे का?
आणि सत्य हे आहे की कच्चे दूध पिल्याने आपल्या आरोग्याला हानी पोहचते. अमेरिकेच्या आरोग्य संरक्षण संस्थेच्या 'अन्न आणि औषध प्रशासना'च्या मते, कच्च्या दुधामध्ये एस्चेरिचिया कोला (ई. कोलाय) आणि लिस्टेरिया, साल्मोनेला इत्यादी शरीराला घातक अनेक जीवाणू असू शकतात. कच्च्या दुधाचे सेवन केल्यामुळे व्यक्तीला विषबाधा होऊ शकते.
विमा कंपन्या शेतकऱ्यांसाठी वरदान की शाप, धक्कादायक प्रकार आला समोर
कच्चे दूध पिण्याचे परिणाम -
कच्च्या दुधात असलेले बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे डायरिया, संधिवात आणि डिहायड्रेशन सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात,याच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील ऍसिडची पातळी वाढते जे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
धक्कादायक! वादळी पावसाचा हाहाकार, 25 जणांचा मृत्यू
कच्चे दूध दूषित असू शकते-
आपल्या आरोग्यासाठी कच्चे दूध पिणे हानिकारक आहे कारण जनावराचे दूध काढताना स्वछ्तेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले असेल तर ते दूध आपल्या आरोग्याला हानी पोहचवू शकते.स्वच्छ हात आणि स्वच्छ भांडी वापरली नाहीत तर दुधात घाण येऊ शकते. म्हणूनच हे आवश्यक आहे की आपण दूध उकळल्यानंतर ते प्यावे, जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया मरतील आणि दूध पिण्यायोग्य बनेल.
महत्वाच्या बातम्या:
कृषी विकास दराबाबत आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
Published on: 20 May 2022, 05:33 IST