बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजार जडत आहेत. लठ्ठपणा, मधुमेह यासारखे आजाराच्या विळख्यात आपण अडकत आहोत. या बदलेलेल्या जीवनशैलीमुळे आणि इतर कारणांमुळे तणाव, नैराश्य, ब्रेन फॉग इत्यादी मानसीक आजार वाढले आहेत.
मधुमेह, आणि लठ्ठपणासाठी अनेक गोष्टी करत असतो. परंतु तणाव, नैराश्य, ब्रेन फॉग या आजारांकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचं दिसतं. या आजारांपासून वाचण्यासाठी मेंदू निरोगी राहणे आवश्यक आहे. यासाठी डाएटवर सतत लक्ष ठेवले पाहिजे. डॉक्टर सुद्धा मेंदु निरोगी ठेवण्याासाठी काही पदार्थ सेवन करण्याचा सल्ला देतात. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे, हे जाणून घेऊया...
फॅटी फिश खा
सी- फूडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदुला निरोगी ठेवते. एका संशोधनात खुलासा झाला आहे की ओमेगा -३ फॅटी अॅसिडच्या सेवनाने ब्रेन डिसऑर्डरची धोका खूप कमी होतो.
आक्रोड खा
अनेक संशोधनात दावा करण्यात आला आहे की, आक्रोड खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो. सोबतच स्मरणशक्ती वाढते. मेंदू व्यवस्थित काम करण्यास मदत होते, यासाठी रोज एक मुठ आक्रोडचे सेवन करा. तसेच सुकामेवा आणि बी यांचेही सेवन करा. आहारात बेरीज समावेश करू शकता.
या गोष्टी टाळा अन् दिमाग बत्ती चलाओ
हेल्थ एक्सपर्टनुसार, स्मोकिंग, बिअर, पॅकेट बंद खाण्याचे पदार्थ, जास्त काळ फ्रिजमध्ये साठवलेले रेड मीट, मासे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजे. सोबतच खाण्यात मीठाचे प्रमाण मर्यादित करावे.
Published on: 18 September 2021, 03:12 IST