रक्तातील ऑक्सिजनचे पातळी वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे

24 April 2021 11:16 PM By: KJ Maharashtra
चांगल्या आहारातून मिळवा ऑक्सिजन

चांगल्या आहारातून मिळवा ऑक्सिजन

सध्या देशभरात तसेच संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरु आहे. सध्याची परिस्थिती बिकट असून तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तरच आपण या विषाणू वर मात करू शकतो.त्यामुळे सध्याच्या काळात इम्मुनिटी पॉवर वाढवणे सोबतच आपल्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी योग्य ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.

त्यामुळे आपले दैनंदिन रूटीन  तसेच आपला आहार संतुलित असायला हवा. आपल्याला माहिती आहे की,  रक्तातील हिमोग्लोबिनचे पातळी योग्य ठेवण्यासाठी आयर्न,कॉपर, विटामिन ए, विटामिन b12, फॉलिक ऍसिड इत्यादी घटकांची आवश्यकता असते.  या घटकांमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. शरीरातील ऑक्सिजन च्या वहनासाठी ऑक्सिजनची हिमोग्लोबिनची पातळी योग्य असणे फार गरजेचे आहे.  त्यासाठी आहारात कोणते पदार्थांचे सेवन करणे किंवा अंतर्भाव करणे महत्त्वाचे आहे  त्याबद्दल या लेखात जाणून घेऊ या.

  • आहारात प्रामुख्याने शेंग भाजी, हिरव्या पालेभाज्या, डाळी व मटार यांचा समावेश करावा.
  • गाजर,  रताळ, दुधी भोपळा,  आंबा, पालक यांचा अंतर्भाव आहारात करावा.
  • मशरूम,  सूर्यफुलाच्या बिया, बटाटे,  भुईमुगाच्या शेंगा, ब्रोकोली, ब्राउन राईस,  पनीर, ओट्स  इत्यादी पदार्थांमधून आठ टक्क्यांनी पासून 52 टक्‍क्‍यांपर्यंत वितामिन बी 5 मिळते.
  • बटाटे,  तीळ, काजू,  मशरूम इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश केल्यानेकोपर ची मात्रा भरपूर प्रमाणात असते.

 

     

मांसाहार

  • ज्या व्यक्ती मांसाहार करतात अशा व्यक्तींनी शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी ओयस्टर म्हणजेच शिंपल्यांचा आहारात समावेश करावा.कारण 90 ग्रॅम कालव्यामध्ये( शिंपले ) 245 टक्के कॉपर असते.
  • 90 ग्रॅम खेकड्यांचे सेवन केले तर 30 टक्के कॉपर मिळते.
  • कोंबडी, बकरा,  बदक आणि कालवे यांच्या मध्ये आयर्न असते.
  • मांसाहारी पदार्थ मधून जवळपास 52 टक्का आयर्न मिळत असते.
  • अंडी व मटन यामधून विटामिन ए व आयर्न मिळते.
  • चिकन,मासे वा अंड्यामधून विटामिन बी5 भरपूर प्रमाणात मिळते.

लिंबू

 लिंबा मध्ये खूप अधिक प्रमाणात पाण्याची असते.  त्यामुळे लिंबाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. त्यासाठी दिवसातून कमीत-कमी दोन वेळा लिंबाचे सेवन केले पाहिजे.

 दही

 दही मध्ये प्रथिने,  जीवनसत्वेआणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. फारच कमी लोकांना माहिती आहे की दह्याचे सेवन केल्याने ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते.  त्यामुळे दही खाणे हे आरोग्यास फायदेशीर आहे.

लसूण

 लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऑक्सीजन पातळि सामान्य राहते.  त्याचबरोबर लसुन खाल्ल्याने सर्दी, खोकला,  आम्लपित्त व सांधे दुखी यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो. 

    केळी

 केळी खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहते.  तसेच केळी मध्ये पोट्याशियम, मूड रेगुलेटिंग फोलेट टायटो फन असतात.  हे सर्व वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात.

 

oxygen levels oxygen ऑक्सिजन कोरोना corona
English Summary: What to eat to increase oxygen levels

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.