Health

मेहता काका खूपच आश्चर्यचकित झाले होते.

Updated on 27 May, 2022 2:41 PM IST

टी.व्ही.वर ज्या टूथपेस्टची ‘सर्वात चांगली आणि दातांचे संरक्षण करणारी टूथपेस्ट’ अशी जाहिरात केली जाते, तीच टूथपेस्ट वर्षांनुवर्षे वापरूनही, त्यांचे अनेक दात कसे काय किडले, याचे त्यांना कोडे पडले होते! यामध्ये ती पेस्ट तर कारणीभुत आहेच परंतु दातांच्या सुरक्षेसाठी योग्य आहार ही घ्यावा लागतो.आजच्या बदललेल्या खाण्या-पिण्याच्या सवयी पूर्वी आपल्या आहारात जाडय़ा- भरडय़ा, कच्च्या आणि नैसर्गिक स्वरूपाच्या अन्नपदार्थाचा समावेश असे. शेतातून – मळ्यातून येणाऱ्या ताज्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, कुरकुरीत, टणक आणि धागेदार फळे आणि गाजर, काकडी, बोरे, कैरी, करवंदे, ऊस, मक्याची कणसे अशा रानमेव्याचाही समावेश अधिक असे.

कच्ची फळे, भाज्या, पालेभाज्या खाताना दातांच्या तोडणे, फाडणे, चघळणे, चावणे, भुगा करणे, फोडणे अशा विविध प्रकारच्या कणखर हालचाली होतात. शिवाय अशा कडक आणि धागेदार अन्नपदार्थाचे दाताच्या पृष्ठभागाशी घर्षण होऊन दात आपोआपच घासले जातात, स्वच्छ होतात. दातावर-दाढांवर अन्नाचे मऊ, चिकट कण शिल्लक राहात नाहीत आणि परिणामी दात किडण्याचे प्रमाण कमी होत जाते.हल्ली मिक्सर-ग्राइंडर कुकरसारख्या उपकरणांचा वापर करून तयार केलेले अन्नपदार्थ खूप मऊ असतात.

इतके, की कित्येकदा असे पदार्थ खायला दातांची गरजही भासत नाही. बदललेल्या आहार संस्कृतीत ‘जंक फूड’चा वाटा खूपच मोठा आहे. ‘विकिपिडिया’वर जंक फूडचे नेमके वर्णन केले आहे. मायकेल जेकबसन याने १९७२ मध्ये सर्वात प्रथम जंक फूड ही संज्ञा वापरली. ‘ज्या अन्नामध्ये खूप कमी पोषणमूल्ये असतात, आणि ज्यात चरबी, साखर व मीठ यांचे प्रमाण अधिक असते, म्हणजे प्रोटीन्स, जीवनसत्त्वे, खनिजपदार्थ खूप कमी प्रमाणात आणि कॅलरीज खूप अधिक प्रमाणात असतात, अशा अन्नाला जंक फूड म्हटले जाते. जंक फूड मध्ये अतिशुद्ध, प्रक्रियायुक्त पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे दात किडण्याला चांगलीच संधी मिळते.

त्यामुळे दातांच्या आरोग्यासाठी आपल्याला योग्य टूथपेस्ट किंवा मंजन तर निवडावे लागेलच परंतु योग्य आहार देखील असला पाहिजे.शेतातून – मळ्यातून येणाऱ्या ताज्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, कुरकुरीत, टणक आणि धागेदार फळे आणि गाजर, काकडी, बोरे, कैरी, करवंदे, ऊस, मक्याची कणसे अशा रानमेव्याचाही समावेश अधिक असे.कच्ची फळे, भाज्या, पालेभाज्या खाताना दातांच्या तोडणे, फाडणे, चघळणे, चावणे, भुगा करणे, फोडणे अशा विविध प्रकारच्या कणखर हालचाली होतात. शिवाय अशा कडक आणि धागेदार अन्नपदार्थाचे दाताच्या पृष्ठभागाशी घर्षण होऊन दात आपोआपच घासले जातात, स्वच्छ होतात.

 

दातांच्या सर्व समस्या वर नॅचरोपॅथीने खात्रीशीर उपचार संपर्क

Nutritionist & Dietician

Naturopathist

Amit Bhorkar

whats app: 9673797495

English Summary: What should be the diet for teeth?
Published on: 27 May 2022, 02:41 IST