Health

निसर्गोपचाराचे क्षेत्र हे आगळेवेगळे आहे. ही एक आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी प्रमाणेच

Updated on 11 May, 2022 6:51 PM IST

उपचारपद्धती असून निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने रोगावर उपचार केला जातो. औषधांचे दुष्परिणाम, औषधांच्या न परवडणा-या किमती या पार्श्वभूमीवर सारे जग निसर्गोपचाराकडे वळत आहे.निसर्गोपचार म्हणजे शरीराला कोणत्या प्रकाराची हानी न होऊ देता त्यावरउपचार करणे. आजच्या काळात तीव्र आणि मोठ्या आजारांच्या उपचारासाठी फारच प्रचलित आहे.

निसर्गोपचाराचे वर्णन आपल्या वेदशास्त्रांमध्ये केले गेले आहे. यामध्ये शरीरातील जुने लपलेले आजारही बाहेर येतात. ही उपचार पद्धती शारीरिकच नव्हे तर मानसिक आजारांसाठी पण उपयोगी आहे. या मध्ये कुठलेही औषध न वापरता पाच घटक वापरले जातात.निसर्गोपचार म्हणजे निसर्गाच्या मदतीने केला जाणारा उपचार. या उपचार पद्धतीमध्ये औषधांचा वापर न करून नैसर्गिक 5 घटक-पृथ्वी (माती), अग्नी, आकाश, जल, वायू यांचा वापर करून रुग्णाला रोगाविरुद्ध लढा करण्यासाठी सक्षम करते.

या घटकातील मातीचा वापर शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी वापरले जाते, पाण्याचा वापर हायड्रोथेरपी म्हणून केले जाते. यामुळे पोटाचा त्रास आणि लघवीची समस्या दूर होते. या मध्ये होमिओपॅथी, एक्यूपंचर, हर्बल औषध तसेच बायो-रेझोनांस, ओझोन थेरेपी आणि कोलन हायड्रोथेरेपी सारख्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घरीच या उपचाराच्या साहाय्याने सांधेदुखी, ऑर्थरायटीस,

स्पॉन्डिलाइटिस, सिस्टिका, मायग्रेन, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन रोग, दमा, ब्राँकायटिस, मूळव्याध (पाईल्स), बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी, पेप्टिक अल्सर, फॅटी यकृत, कोलायटिस, सीओपीडी (क्रॉनिक, ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) आणि त्वचा संबंधित रोगांचा यशस्वीरीत्या उपचार केला जाऊ शकतो. पण त्यापूर्वी ह्याची संपूर्ण माहिती असणे देखील आवश्यक आहे.

 

Nutritionist & Dietician

Naturopathist 

 Dr. Amit Bhorkar

whats app: 7218332218

English Summary: What is naturopathy? Understand this first
Published on: 11 May 2022, 06:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)