Health

जीवन म्हणजे एक काटेरी कुंपणा प्रमाणे असते की जे काटेरी कुंपण चहू बाजूनी वेढलेली जरी असले तरी त्यामधला मार्ग हा बघावा लागत असतो .

Updated on 09 April, 2022 5:18 PM IST

जीवन म्हणजे एक काटेरी कुंपणा प्रमाणे असते की जे काटेरी कुंपण चहू बाजूनी वेढलेली जरी असले तरी त्यामधला मार्ग हा बघावा लागत असतो . जसे की काळोख्या रात्री बंद पडलेल्या खोलीमध्ये प्रकाशाची ठिणगी उडवावा लागते आणि जीवनामध्ये आपण चालत असताना पुढे ठेच लागेल की काय आपण याचा विचार करत असतो परंतु चालत असताना आपल्या पायाच्या पाऊल खुणा उमटत असतात अगदी काटेरी कुंपणा सारख्याच व जीवन हे एक समुद्रातल्या पाण्याच्या लहरीप्रमाणे असते म्हणजे समुद्राला ज्याप्रमाणे भरती-ओहोटी येत असते किंवा वातावरणामध्ये काही बदल घडून आल्यास म्हणजे ज्याप्रमाणे आता या पृथ्वीतलावरचे वातावरण दिवसेंदिवस दूषित व गलिच्छ होत चाललेले आहेत त्याप्रमाणे त्या वातावरणाचा परिणाम आपल्याला त्या समुद्रातल्या पायाच्या लहरीवर दिसून येत आहे.

असेच तीच गोष्ट मानवाच्या जीवनावर म्हणजेच प्रतीबिंबा सारखीच दिसून येत आहे जीवन हे एक संगमा प्रमाणे आहे म्हणजेच कधी माणसाच्या जीवनामध्ये सुख असते तर कधी दुःख असते हे असेच जीवनाचे चालत राहते माणसाच्या जीवनामध्ये कधी आणि कोणत्या वेळेवर कसे संकट येईल व त्यावर कशा पद्धतीने ते संकट सावरता येईल याची काळजी जोपासावी लागते हे सर्व जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्य जगत असतो . जीवन म्हणजे मनुष्याचा जन्म आणि मृत्यू यामधील जो वेळ असतो आणि काळ असतो या कालावधीला जीवन असे म्हणतात. आणि हे ईश्वराचं वरदानच म्हटले जाईल परंतु मनुष्य देहाचा जन्म हा त्याच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे होत नाही हे होत असते ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे म्हणजेच नर जात आणि मादी जात या दोघांच्या प्रेमातून घडून आलेला हा तिसरा देह म्हणजेच एक आम्हा तुम्हा सारखं जीवन होय जीवन एक एसटीच्या प्रवासा सारखाच असते.

कारण एसटीमध्ये बसलेल्या प्रत्येक प्रवाशाचे स्टेशन हे वेगळे असून त्यांच्या विचारांच्या दिशा पण वेगळ्या असतात .जन्म आणि मृत्यू म्हणजे एका डायरी प्रमाणे असते की जे पहिल्या पानावर असते ते जन्म आणि शेवटच्या पानावर असतो तो मृत्यू जीवनातल्या प्रत्येक मानवाला जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्ट निसर्गा प्रमाणेच असतात परंतु या मधला जो ग्याप आहे म्हणजे डायरीतली जे उरलेले पाणी आहेत ते आपल्याला ईश्वराने स्वतःहून काय घडवायचे काय निर्माण करायची व कशा पद्धतीने जीवन जगायचे व जगातल्या कित्येक गोष्टी माहिती करून अभ्यासून प्रत्यक्ष बघून समजून घेऊन व पैशाचा लोभ न करता पैसा एक धनलक्ष्मी मानल्या जाते तो आपल्या जीवनामध्ये अनमोल तर आहेच परंतु याचा वापर योग्य त्या ठिकाणी केला गेला पाहिजे व तो कमावताना सुद्धा चांगल्या पद्धतीने कामावला गेला पाहिजे.

म्हणजेच आपल्याला ईश्वराने या रिकाम्या डायरीमध्ये आपण जीवन जगत असताना काय काय केलेत कोणत्या कलाकृतीचा अवलंब केला आहे. लिहिण्याचा एक मोका ईश्वराने दिला आहे. जीवन हे एक कटुसत्य आहे आणि मृत्यू अटळ आहे. म्हणून म्हणतोय की जीवनामध्ये चांगले काम करा की आपल्याला चांगल्या पद्धतीने ती डायरी लिहिण्यात येईल व ती लिहिताना एक आत्मविश्वास जागा होईल की आपण जीवनामध्ये काहीतरी केले नाहीतर ती डायरी तशीच रिकामी राहील. जीवनामध्ये मनुष्य हा स्वतः कधीच स्वतःला विचारून बघत नाही म्हणजेच स्वतः ला फोन करून बघत नाही तो दुसऱ्याकडे बोट दाखवत असतो. म्हणजेच दुसऱ्यालाच फोन करत असतो म्हणून जिवनाला चांगल्या रीतीने समजून घ्या व आपल्या जीवनाचा सार नक्कीच तुम्ही त्या मनुष्य जीवनाच्या डायरीमध्ये लिहाल म्हणजे तुम्हाला कळेल की जीवन म्हणजे काय आहे जीवनाच्या प्रवासावर वेगाने धावणारी आघाडी धूर जरी सोडत असली तरी मात्र मृत्यू च्या स्टेशन वर तिला थांबावेच लागते.  

 

लेखक- मुकुंद उगले.

प्रगतशील युवा शेतकरी

मो- 9309711036

English Summary: What is mean by life know about you happy in 1 minute
Published on: 09 April 2022, 05:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)