औषधं खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करणे महत्त्वाचे आहे आणि ते आपण करतो. परंतु, ताप, सर्दी, खोकला यासाठी विकत घेतलेल्या पेनकिलर्स आपण वर्ष-दोन वर्ष वापरत नाही. म्हणून अशा गोळ्या किंवा सिरप घेताना एकदा नाहीतर दोनदा त्याची एक्सपायरी डेट चेक करायला हवी.
अनेक लोक या गोष्टीकडे गंभीरपणे बघत नाहीत आणि या गोळ्या घेतल्यावर काय होणार आहे, असे कुतुहूल त्यांच्या मनात असते. एक्सपायरड गोळ्या घेतल्यास (नकळत) काय दुष्परिणाम होऊ शकतात,
कोणतंही औषधं असो, प्रत्येक औषधाचा स्वतःचा असा स्टाबिलीटी पिरियड असतो. तसंच औषधाची मार्जिन टेस्ट केली जाते.
उदा. म्हणजेच जर औषधाचा स्टाबिलीटी पिरियड वर्षभराचा असेल तर त्याची एक्सपायरी डेट ६ महिन्यांचीच दिली जाते. म्हणून जर तुम्ही एक्सपायर्ड गोळी घेतलीत तर कदाचित आरोग्यावर काहीही दुष्परिणाम होणार नाहीत.
कारण त्याचा स्टाबिलीटी पिरियड संपलेला नसतो. तसंच औषध दोन, तीन किंवा पाच वर्षापर्यंत स्टेबल राहू शकतं.
परंतु, ते औषधाच्या प्रकारावर व निर्मितीवर अवलंबून आहे. एक्सपायर्ड औषध घेतल्याने ते आजारावर परिणामकारक ठरणार नाही. कारण त्याची क्षमता कमी झालेली असेल. कारण काळानुसार औषधातल्या केमिकल कंपाऊंडची केमिकल चेंजेस करण्याची क्षमता कमी होते. जे हानिकारक ठरू शकते किंवा नाही.
चुकून किंवा नकळत एक्सपायर्ड गोळ्या घेतल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुमच्या शरीरावर त्याचा काही परिणाम झाला आहे का, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर ब्लड टेस्ट करतील. त्याचबरोबर लिव्हर फंगशन टेस्ट आणि किडनी फंगशन टेस्ट करण्याचा सल्ला देतील. (हे औषधाच्या प्रकारावर अवलंबून आहे) त्यामुळे किडनी, लिव्हरला काही हानी पोहचली आहे का, ते समजेल.
उपचार करण्यापेक्षा काळजी घेणे केव्हाही योग्यच. म्हणून कधीही औषध घेण्यापूर्वी न विसरता त्याची एक्सपायरी डेट चेक करा.
Nutritionist & Dietitian
Naturopathist
Amit Bhorkar
whats app: 9673797495
Published on: 28 April 2022, 07:16 IST