Health

शरीराच्या कोणत्याही अवयवाचे दुखणे म्हणजे अंगदुखी.

Updated on 19 May, 2022 4:03 PM IST
पण अनेकदा सांधेदुखी किंवा स्नायुदुखीला अंगदुखी समजले जाते. काही वेळेला शरीराचा एखादाच भाग दुखतो तर काही वेळेला संपूर्ण शरीर मोडून आल्याची भावना होते. सांधे धरल्यासारखे वाटतात.
अंगदुखीची कारणे :अंगदुखी हे लक्षण असल्याने अनेक आजारांमध्ये अंग मोडून येऊ शकते. प्रामुख्याने संसर्गजन्य ताप, मलेरिया, टायफाइड, डेंग्यू, पोलियो अशा आजारांमध्ये तापासोबत अंग दुखते.काहीवेळा शरीरात डी जीवनसत्त्व कमी असल्यानेही सांधेदुखी होते. काहीवेळा हाडांना, स्नायूंना मार बसल्याने शरीर ठणकते. 

तर अधिक व्यायाम किंवा शरीराच्या मर्यादेपलिकडे चालणे, धावणे किंवा वजन उचले शरीर दुखते. हाडावर ताण पडल्यास तसेच मनावर तणाव असल्यासही अंगदुखी होऊ शकते.या शिवाय औषधांची किंवा इतर कशाचीही ॲलर्जी एचआयव्ही संसर्ग, कॅन्सर यासारख्या आजारांमध्येही शरीर दुखायला लागते.

काही लागलं, खुपलं तर त्यापाठोपाठ वेदना होणे स्वाभाविक असते, या वेदना सहसा स्थानिक असतात. मात्र जेव्हा आघात झालेला नसूनही संपूर्ण अंग दुखते, दैनंदिन काम सहजतेने करता येत नाही तेव्हा त्यावर उपचार करण्याची गरज असते. अंगदुखी हा रोग नाही तर, ते एक लक्षण आहे
English Summary: What exactly is body ache? Understand this first
Published on: 19 May 2022, 04:03 IST