Health

गीर गाईच्या तुपामध्ये पोषक घटक - गीर गाय ही देशातील प्रसिद्ध दुधाळ जनावरांची जात आहे.ही गाय विशेषत: गुजरात राज्यातील गीर जंगलात आढळते.गीर गायीची जात चांगल्या दुग्धोत्पादनासाठी ओळखली जाते.गीर गाईच्या दुधात सोन्याचे घटक आढळतात जे रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत करतात.या गीर गाईच्या A2 दुधापासून बनवलेले तूप ही या गाईची सर्वात मोठी ओळख आहे कारण ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे,कारण ती बनवताना कोणतेही रसायन किंवा इतर हानिकारक घटक जोडले जात नाहीत.त्यामुळे गीर गायीच्या तुपामध्ये विशेष घटक असतात.

Updated on 21 January, 2024 5:11 PM IST

आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वजांपासून देशी खाद्यपदार्थाला प्राधान्य दिले जाते.भारतात, सुरुवातीपासूनच, दूध, दही, तूप, ताक इत्यादी आपल्या आहाराचा एक प्रमुख भाग आहे, जे सात्विक आणि संतुलित तसेच पोषणाचे मुख्य स्त्रोत आहे.आजच्या काळात वाढती आधुनिकता आणि बदलते खाद्य वातावरण यामुळे आपण स्थानिक आणि पौष्टिक अन्नापासून दूर गेलो आहोत. आजच्या पिढीला तूप आणि दूध हे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे याची माहिती नाही.आज बाजारात गाय, म्हशी, अगदी शेळीच्या दुधापासून बनवलेले विविध प्रकारचे तूप उपलब्ध आहे.पण, जर तुम्ही शुद्ध देशी गाईचे तूप शोधत असाल,तरगीर गायीचे तुप आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुजरातमधील गीरचे नाव तुम्ही ऐकले असेलच. गीर विशेषतः दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पहिला गीरचा सिंह आणि दुसरा गीरचा गाय. आज या लेखात आम्‍ही तुम्‍हाला याच गीर गाईच्‍या देसी तुपाविषयी सांगणार आहोत जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

गीर गाईच्या तुपामध्ये पोषक घटक -

गीर गाय ही देशातील प्रसिद्ध दुधाळ जनावरांची जात आहे.ही गाय विशेषत: गुजरात राज्यातील गीर जंगलात आढळते.गीर गायीची जात चांगल्या दुग्धोत्पादनासाठी ओळखली जाते.गीर गाईच्या दुधात सोन्याचे घटक आढळतात जे रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत करतात.या गीर गाईच्या A2 दुधापासून बनवलेले तूप ही या गाईची सर्वात मोठी ओळख आहे कारण ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे,कारण ती बनवताना कोणतेही रसायन किंवा इतर हानिकारक घटक जोडले जात नाहीत.त्यामुळे गीर गायीच्या तुपामध्ये विशेष घटक असतात.

गीर गाईचे तूप खाण्याचे आरोग्याला फायदे

गीर गायीचे तूप इतर कोणत्याही तुपापेक्षा चांगले मानले जाते. गीर गाईचे तूप खाल्ल्याने खालील फायदे होतात.


प्रतिकारशक्ती निर्माण करणेप्रतिकारशक्ती निर्माण करणे


गीर गाईचे तूप पचनसंस्थेशी संबंधित इतर समस्या दूर करण्यासाठी हे प्रभावी आहे.जळजळ कमी करते.


गीर गायीचे तूप सेवन केल्याने मानसिक आरोग्य सुधारते.तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते.


लहान मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते त्यांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप योग्य आहे.


गीर गाईचे तूप व्हिटॅमिन ए, ई, डी, के आणि ओमेगा -3, 6 आणि 9 सारख्या विविध चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्त्वे समृद्ध आहे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवते.


A2 गिर गाईच्या तुपामध्ये भरपूर प्रमाणात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतात. गीर गाईच्या वापराने आपली त्वचा सुधारते. ते त्वचेवर लावल्यानेही फायदा होतो.


साधारणपणे असा समज आहे की तूप खाल्ल्याने वजन वाढते पण तुपाच्या बाबतीत असे होत नाही. गीर गाईचे तूप चांगल्या कोलेस्टेरॉलचा स्रोत आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. गीर गाईच्या तूपाच्या नियमित सेवनाने चयापचय क्रिया वाढते.


गीर गाईचे दूध आणि तूपामुळे अनेक रोगांपासून मुक्तता-

गीर गाईचे दूध आणि तूप सेवन केल्याने मानसिक आजार, बेशुद्धी, गोंधळ, हृदयविकार, पित्ताशय, कर्करोग यांसारख्या घातक आजारांपासून संरक्षण होते.


रक्तातील लाल पेशी वाढवते जे हृदयाच्या समस्यांसाठी महत्वाचे आहे.आणि त्यामुळे आजारापासुन बचाव होतो.


डोळ्याचे विकार कमी होतात.


शांत झोप व डोक्याचे त्रास कमी करते.


शरीरातील उष्णता कमी करते .


कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये उपयुक्त आहे.


हृदयरोग टाळतात,मधुमेह, अर्धांगवायू, आंबटपणा इत्यादी साठी उपयुक्त्त


देशी तुप संधीवातातून बरे होण्यास मदत करते.


गुडघेदुखीच्या दुखण्यांसाठी योग्य उपाय आहे.


सतत सेवन केल्याने मूळव्याध बरे करते.

English Summary: What are the health benefits of eating ghee? Know the benefits of ghee ghee geer ghee
Published on: 21 January 2024, 05:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)