वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे हे एक कठीण काम आहे. देशात लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात अजून वाढ झाली आहे. एकदा वजन वाढले म्हणजे मग ते कमी करणे सोपे नसते. विशेषत: पोटाभोवती असलेल्या चरबीपासून मुक्त होणे खूपच कठीण असते. पोटावर साठलेली ही चरबी कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
वर्कआउट्स आणि डाएट कंट्रोलच्या मदतीने अनेक लोक पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करतात मात्र अनेकदा यश येतं नाही. यामागे अनुवांशिक कारणही असू शकते, परंतु आयुर्वेदानुसार जीवनशैलीत काही बदल केले तर पोटाची चरबी कमी होऊ शकते. आज आपण याविषयीच सविस्तर जाणुन घेणार आहोत.
कोमट पाणी पिल्याने वजन नियंत्रित केले जाऊ शकते- ज्या व्यक्तीना वजन नियंत्रित करायचे असेल त्यांनी दिवसभर फक्त कोमट पाणी प्यावे. जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा फ्रीजमधील थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. खरं तर, कोमट पाण्याने चयापचय क्रिया सक्रिय होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीर हायड्रेट तर होतेच, पण पोटावर जमा झालेली चरबीही कमी होते. पाण्याशिवाय फळे आणि ज्यूसचे सेवन करणेही फायदेशीर ठरू शकते. फळे पचन सुधारतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
महत्वाच्या बातम्या:
अन्न चांगले चावून खावे - अनेकदा लोक घाईत जेवण करतात आणि यामुळे अन्न नीट चावले जातं नाहीत. मित्रांनो अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी ते नीट चावून खाणे आवश्यक असते. जेव्हा तोंडाच्या लाळेमध्ये कर्बोदके मिसळतात तेव्हा पचन सुरू होते. त्यामुळे अन्न नीट चावले पाहिजे. हे तृप्ति संप्रेरक देखील वाढवते, ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते.
मेथीचे पाणी- पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी भाजलेली मेथी पावडर सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत घ्यावी. याशिवाय तुम्ही मेथी रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी त्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास खूप मदत होते.
जोरात चालत जावे- पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज चालणे देखील खूप मदत करते. दररोज किमान 30 मिनिटे वेगाने चालावे. याशिवाय योगा, एरोबिक्स आणि पिलेट्सच्या मदतीने पोटाची चरबी कमी करू शकले जाऊ शकते.
Published on: 06 May 2022, 08:36 IST