Health

तंबाखू हे एक नगदी पीक आहे. भारतीय पुराणतही तंबाखूचा उल्लेख आढळतो.

Updated on 26 April, 2022 8:29 AM IST

तंबाखू हे एक नगदी पीक आहे. भारतीय पुराणतही तंबाखूचा उल्लेख आढळतो. तंबाखूचा वापर धूम्रपानासाठी तसेच खाण्यासाठी केला जातो. या दोन्हीचा आरोग्यावर हानिकारक परिणाम असून कर्करोगही होऊ शकतो. आज आपण जरा हटके विषय पाहणार आहोत. तंबाखू हा तसा ग्रामीण भागात सर्रास उगवला तसेच वापरला जाणारा भारतात उष्ण कटिबंधात सर्वच ठीकाणी तंबाखूची शेती केली जाते. परंतु तंबाखूचा औषधी वापरही केला जातो जो फायदेशीर ठरतो. चला मित्रांनो तंबाखूचा औषधी वापर बघू, तर या तंबाखूची वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. 

तंबाखूचा कल्कलिया, पुरबी, सुरती, गुजराती असे प्रमुख प्रकार आहेत. तंबाखूमुळे कॅन्सर होतो हे सत्य आहे. परंतु औषधी वनस्पती म्हणून तंबाखूचा वापर केल्यास त्याचे फायदे होऊ शकतात. तंबाखूचे सेवन योग्य तज्ञांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात व योग्य वेळी केल्यास त्याचा फायदा होतो.चला तर मग पाहुया तंबाखूचे फायदे.

१) खोकला झाल्यास तंबाखूच्या लाकडांना जाळून त्यातील १२ मिलीग्रॅम राखेमध्ये २ मिलीग्रॅम काळे मीठ मिसळून सेवन केल्यास खोकला बरा होतो. तंबाखूची पाने कफ व वातनाशक आहेत.

२) दातांमध्ये वेदना होत असल्यास मीठ आणि तंबाखू यांच्या बारीक मिश्रणाने मंजन केल्यास दातदुखी, हिरड्यांची सूज दूर होते. दात किडणे थांबते. परंतु सतत तंबाखू सेवन केल्यास गालाला जखम होऊन कॅन्सर होऊ शकतो.

३) दमा किंवा श्वास लागत असल्यास तंबाखूची पाने जाळून २५० मिलीग्रॅम राखेला विड्याच्या पानात घेऊन सेवन केल्यास दम्यात आराम मिळतो.परंतु यात तंबाखू गिळू नये.केवळ रसपान करायचे आहे.

४) केसगळतीची समस्या असल्यास २० ग्रॅम तंबाखू आणि २५ ग्रॅम कण्हेरीची पाने जाळून त्या राखेत १०० मिलीलिटर मोहरीचे तेल मिसळून ते मंद आचेवर गरम करा, थंड झाल्यावर केसांना लावा. केस गळती थांबते.

कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास तिचा दुष्परिणाम दिसून येतो त्यामुळे कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात केल्यास ती आपणास फायदेशीर ठरते किंवा दुष्परिणाम दिसून येत नाही.

 

टीप - तंबाखूचे सेवन करणे अगोदर एकवेळ डॉक्टरचा सल्ला घ्या

English Summary: Wavv read this tobacco eating benefits will you incidence
Published on: 26 April 2022, 08:26 IST