Health

शिंगाडा पाण्यात उगवणारी वनस्पती आहे. याची वेल असून पानेपाण्यावर तरंगतात. फळे त्रिकोणी आकाराची असतात.त्यांना शिंगाडे म्हणतात. शिंगाडे कच्चे किंवा उकडून खातात. शिंगाडापौष्टिक असतो याला वाळवून पीठ करून लाडू बनवून खातात.

Updated on 14 February, 2022 4:56 PM IST

शिंगाडा पाण्यात उगवणारी वनस्पती आहे. याची वेल असून पानेपाण्यावर तरंगतात. फळे त्रिकोणी आकाराची असतात.त्यांना शिंगाडे म्हणतात. शिंगाडे कच्चे किंवा उकडून खातात. शिंगाडापौष्टिक असतो याला वाळवून पीठ  करून लाडू बनवून खातात.

उत्तर भारतात, विदर्भात मध्य प्रदेशातील अनेक तलावांमध्ये शिंगाडयाची शेती केली जाते.शिंगाडयामध्ये मधुर, शीत, रक्तपित्त, दाह, मेह,अवष्ठभंगकई. गुणधर्म असतात.

  • औषधी उपयोग:-

 अतिसारा वर शिंगाड्याचे पीठ ताकात मिसळून द्यावे. शिंगाडया मध्ये जीवनसत्व 6 मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या विकारात त्यांच्या सेवनाने फायदा होतो.

 शिंगाडयामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने हाडे व दात मजबूत होतात.रक्तपित्तावर शिंगाडे व कचोरा यांचा शिरा करून खावा.

महिलांनी गरोदर पणात शिंगाड्याचे सेवन केल्याने आईचे आरोग्य आणि बाळाचे पोषण चांगले होते. प्रमेह रोगामध्ये शिंगाडा व जाळफळ उगाळून द्यावे. शिंगाडयामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने याच्या सेवनाने पोट साफ राहते. तसेच मधुमेहातील शुगर कॅन्सर, हृदयविकार यांचा धोका कमी होण्यास मदत होते.

 शिंगाडयातील पोटॅशियम मुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. सारखे पाय किंवा टाचांना भेगा पडत असतील तर शिंगाड्याचे सेवन केल्याने बरे होण्यास मदत होते. कारण यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते. कावीळ झाल्यास ती लवकर बरी होण्यासाठी शिंगाडा खाण्यास द्यावा.

 मुका मार लागून त्याला सूज आल्यास शिंगाड्याचा पिठाचा लेप करावा. धातु पुष्टतेसाठी शिंगाड्याचे लाडू करून द्यावे. शिंगाड्याच्या अतिसेवनाने अपचन, पोट दुखणे, सर्दी, खोकला इ. विकार होऊ शकतात. कोणत्याही वनस्पतीचा औषधी उपयोग करण्याच्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

( टीप- कुठलाही औषधोपचार करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

English Summary: water chestnut is grow in water and that plant is medicinal plant
Published on: 14 February 2022, 04:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)