Health

अनवाणी पायाने सकाळी सकाळी जमिनीवर चालल्याने किंवा ओल्या जमिनीवर किंवा दव असलेल्या गवतावर अनवाणी चालण्याचा आनंद खूप वेगळा असतो. हिरव्या गवतावर सकाळी अनवाणी पायाने चालल्यामुळे आपल्याला खूप आरोग्यदायी फायदे मिळतात. याबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.

Updated on 30 August, 2022 4:04 PM IST

अनवाणी पायाने सकाळी सकाळी जमिनीवर चालल्याने किंवा ओल्या जमिनीवर किंवा दव असलेल्या गवतावर अनवाणी चालण्याचा आनंद खूप वेगळा असतो. हिरव्या गवतावर सकाळी अनवाणी पायाने चालल्यामुळे आपल्याला खूप आरोग्यदायी फायदे मिळतात. याबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.

सकाळी हिरवळीवर चालण्याचे फायदे

 बरेच जण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. कारण मॉर्निंग वॉक हा शरीरासाठी खूप महत्वपूर्ण असून यामुळे शरीर आणि मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. ठणठणीत आरोग्यासाठी चालणे खूप महत्त्वाचे असून सकाळी उद्यानामध्ये फिरायला जाणे किंवा शेतामध्ये बांधाच्या कडेला असलेल्या हिरव्या गवतावर चालल्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते.

नक्की वाचा:Cauliflower consumption: सावधान! प्रमाणापेक्षा जास्त फुलकोबीचे सेवन केल्याने होतात गंभीर समस्या

1- मनातील ताण कमी होतो- तुम्ही जितके जास्त काळ हिरव्या गवतावर चालत राहाल तितके तुम्ही निरोगी राहाल. हिरवळी पुढे स्नायूंचा ताण कमी होतो व मनाला बळ मिळते.

2- डायबिटीस- मधुमेहाच्या रुग्णांनी हिरवळी मध्ये फिरून दररोज दीर्घ श्वास घेतलास शरीरामध्ये असलेली ऑक्सिजनची समस्या दूर होते.

3- शिंका येणे किंवा ऍलर्जी- हिरवळी चालण्याला आपण ग्रीन थेरपी असे म्हणतो व या थेरपीचा मुख्य भाग म्हणजे हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चालणे होय.

4- दृष्टी- गवतावर दव पडलेले असेल व त्याच्यावर जर तुम्ही चाललात तर दृष्टी सुधारण्यास मदत होते. ज्या लोकांना चष्मा आहे त्यांनी काही दिवस हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चालून बघावे यामुळे अशा लोकांचा चश्मा तरी उतरतो किंवा चश्माचा नंबर तरी कमी होतो.

Health Tips: 'हे' दोन घरगुती उपाय करा आणि पळवा पोटातील गॅस आणि पोटदुखी

5- प्रदूषित हवा- जे लोक बऱ्याचदा दूषित हवेच्या संपर्कामध्ये येतात अशा व्यक्तींना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तसेच या गोष्टीचा परिणाम त्यांच्या मेंदूवर देखील होऊ शकतो म्हणून ग्रीन थेरपी तुमची स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

6- हाय ब्लडप्रेशर- हाय ब्लडप्रेशरचा रुग्णांना दररोज एक तास स्वच्छ वातावरणात बसून आणि काही काळ हिरव्यागार गवतावर अनवाणी पायाने चालल्याने खूप मोठे फायदे मिळतात.

7- निद्रानाश- बऱ्याच लोकांना झोप नीट लागत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी दररोज उद्यानात फेरफटका मारण्याचा प्रयत्न जरूर करावा. तुम्हाला तर चांगली झोप यावी असे वाटत असेल तर दररोज सकाळी 30 मिनिटे गवतावर अनवाणी पायाने चालावे.

8- मानसिक आरोग्य- तुम्ही सकाळी सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायाने फिरल्यास तुम्हाला मानसिक शांतता लाभते.

9- निरोगी हृदयासाठी फायदेशीर- हिरव्या गवतावर अनवाणी चालण्याने हृदयाचे ठोके बरोबर राहतात. शरीराचे तापमान नियंत्रित राहून हार्मोन्सचे संतुलन राखले जाते.

नक्की वाचा:मधुमेह बरे करण्यासाठी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी रेकी हिलिंग

English Summary: walk on green grass in morning is so benificial for health
Published on: 30 August 2022, 04:04 IST