Health

भारतात होळी या सणाला खूप महत्व आहे. होळी सण हा मोठ्या लोकसंख्येत साजरा केला जातो. होळी च्या दिवशी रंगाचा सण म्हणून धुलिवंदन साजरे केले जाते. धुलिवंदन दिवशी वेगवेगळ्या रंगाची उधळून करून रंगपंचमी साजरी केली जाते. आता पर्यंत आपण अनेक रंग एकमेकांना लावून रंगपंचमी साजरी केली आहे मात्र या रंगाचे महत्व आपण कधी जाणून घेतले नाही. रंगपंचमीला आपण जे रंग उधळतो ते रंग आनंद, नशीब तसेच समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आज आपण रंगपंचमीला कोणते रंग वापरावे आणि त्या रंगाचे महत्व काय आहे ते पाहावे लागणार आहे.

Updated on 17 March, 2022 5:48 PM IST

भारतात होळी या सणाला खूप महत्व आहे. होळी सण हा मोठ्या लोकसंख्येत साजरा केला जातो. होळी च्या दिवशी रंगाचा सण म्हणून धुलिवंदन साजरे केले जाते. धुलिवंदन दिवशी वेगवेगळ्या रंगाची उधळून करून रंगपंचमी साजरी केली जाते. आता पर्यंत आपण अनेक रंग एकमेकांना लावून रंगपंचमी साजरी केली आहे मात्र या रंगाचे महत्व आपण कधी जाणून घेतले नाही. रंगपंचमीला आपण जे रंग उधळतो ते रंग आनंद, नशीब तसेच समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आज आपण रंगपंचमीला कोणते रंग वापरावे आणि त्या रंगाचे महत्व काय आहे ते पाहावे लागणार आहे.

रंगाचे महत्व :-

१. लाल रंग :-

लाल रंग हा मंगळ आणि सूर्याचा रंग आहे. जो की हा रंग उष्णता तसेच उत्तेजनेत वाढ करतो. लाल रंगाने जर रंगपंचमी खेळली तर त्याने आपले आरोग्य व प्रतिष्ठा वाढते. लाल रंग हा ऊर्जा तसेच शक्तीचे प्रतीक मानले जाते. मंगळ ग्रह हा जातकाच्या रक्तात मिसळून राहतो. तुम्ही लाल रंगाने जर रंगपंचमी खेळला तर त्याचे हे महत्व राहणार आहे.लाल रंग तयार करण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या तसेच चंदन बारीक करून हा रंग तयार करू शकता. तसेच जर तुम्हाला पातळ रंग बनवायचा असेल तर डाळिंब, गाजर आणि टोमॅटो बीटरूट एकत्र करा आणि झालेल्या मिश्रणाने होळी साजरी करा.

२. हिरवा रंग :-

हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करता येते. हिरवा रंगाने तुम्ही रंगपंचमी खेळला तर तुमच्यामध्ये आनंद, समृद्धी, प्रेम, प्रगती आणि आरोग्यात सुधारणा होते. प्रेम, प्रगती आणि सकारात्मकतेच प्रतीक हिरव्या रंगाला मानले नाते. आपल्या आयुष्यात शांती आणण्याचे काम हिरवा रंग करतो. हिरवा रंग हा बुद्धीचा कारक आहे जे की रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा क्षेत्रामध्ये यश मिळवून देण्याचे काम हिरवा रंग करतो. हिरवा रंग हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उत्तम मानला जातो.हिरवा रंग तयार करण्यासाठी तुम्ही पुदिना, धणे आणि पालकाची पाने उन्हात वाळवून त्याची हिरवी पावडर तयार करू शकता. तुम्ही जर हे पाण्यात उकळून ठेवले तर तर पाण्याला हिरवा रंग येण्यास सुरू होते.

३. पिवळा रंग :-

धर्माचे प्रतीक म्हणून पिवळ्या रंगाला मानले जाते. पिवळा रंग हा गुरू ग्रहाचा रंग आहे जो शरीरातील सर्व इंद्रियामध्ये असतो. पिवळ्या रंगाचे तुम्ही होळी म्हणजेच रंगपंचमी खेळला तर तुमच्यामध्ये प्रेम, सौंदर्य तसेच आनंद वाढतो. पिवळा रंग हा श्रीकृष्णाला सर्वात लोकप्रिय रंग आहे. जे की आपल्यामध्ये असणारी निराशा पिवळा रंग दूर करण्याचे काम करतो.पिवळा रंग तयार करण्यासाठी तुम्ही झेंडूच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुकवाव्यात आणि त्याची पेस्ट करावी किंवा तुम्ही त्यामध्ये हळद टाकावी. तसेच तुम्ही बेसन आणि हळद या दोन्हींचे मिश्रण करून सुद्धा पिवळ्या रंगाची होळी खेळू शकता.

४. गुलाबी रंग :-

गुलाबी रंगाने तुम्ही रंगपंचमी खेळला तर तुमच्यामध्ये प्रेम वाढते. तुमच्या जोडीदारासोबत म्हणजेच तुम्ही प्रियकरासोबत गुलाबी रंगाने होळी खेळा. जे की यामुळे तुमच्या प्रेमाचे अजूनच नाते घट्ट होईल.गुलाबी रंग तयार करण्यासाठी तुम्ही आपल्या दरी असणारे जे गुलाब असते त्या गुलाबाच्या पाकळ्या उन्हामध्ये वाळवाव्य आणि त्या बारीक करून होळी खेळावी किंवा जर तुम्हाला लिक्विड तयार करायचे असेल गुलाबाची पाने बारीक करून गुलाबजेल मध्ये मिश्रण करावे.

५. निळा रंग :-

निळा रंग हा राहू, शनी तसेच केतू या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. निळा रंग हा न्यायाचे प्रतीक मानला जातो. निळा रंग हा रात्री शांत तर दिवसा उग्र दिसतो म्हणजेच तमोगुणी असतो. तुम्ही जर रंगपंचमीला निळ्या रंगाने होळी खेळला तर तुमचे आरोग्य सुधारते. एवढेच नाही तर तुम्ही आजरी लोकांना निळा रंग लावू शकता.निळा रंग तयार करण्यासाठी तुम्ही हिबिस्कसची फुले पाण्यात टाकावी आणि त्याची बारीक पेस्ट करावी किंवा जर तुम्हाला निळा सुका रंग पाहिजे असेल तर
हिबिस्कसची फुले उन्हात वाळवावी आणि ते बारीक करून त्याच्या रंगाची होळी खेळू शकता.

English Summary: Use these natural colors to play Holi, are beneficial for health
Published on: 17 March 2022, 05:48 IST