आजकाल बर्याच जणांनाकाही ना काही आरोग्यविषयक समस्या असतात. त्यातल्या त्यात केस गळणे ही एक समस्या अनेक जणांना आहे. वय कमी असो वा जास्त ही समस्या बऱ्याच जणांमध्ये आढळते.
गळणे थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय अवलंबले जातात. त्यामध्ये अनेक केमिकल युक्त प्रोडक्ट चा वापर केला जातो. परंतु ही समस्या काही कमी होताना दिसतनाही. परंतु यावर चांगला उपाय म्हणजे जर तुम्ही मोठ्या दातांचा कडुलिंबाचा कंगवा वापरला तर केसांची गळती 90 टक्के कमी होऊ शकते. या कंगव्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
कडूलिंबाच्या कंगव्याचे फायदे
कडुलिंबाचा कंगवा जर केसांसाठी वापरलातर अनेक प्रकारचे फायदे मिळतात. लाकडी कंगवा वापरल्यामुळे केसांमध्ये घर्षण कमी होते.त्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण कमी होते. कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या कंगवा बॅक्टेरिया विरोधी आणि सेप्टिक विरोधी आहे त्यामुळे तुमच्या केसांमध्ये असलेला कोंडा आणि टाळूच्या संसर्गापासून आराम मिळतो.
रक्ताभिसरण क्रियेत सुधारणा
हा कंगवा वापरल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच टाळू निरोगी बनते. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. केसांना पोषण देते कडुलिंबाच्या लाकडाचा कंगवा वापरल्याने केस कमी तुटतात. यासोबतच केसांना पोषण मिळते. कडुलिंबाचा कंगवा वापरल्याने टाळूवर असलेले नैसर्गिक तेल केसांमध्ये समान रीतीने व्यवस्थित पसरते. यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात.
Published on: 06 October 2021, 06:57 IST