अपुरी झोप सुद्धा डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात. तसेच सततचे लॅपटॉप समोरचे काम देखील डोळ्यांना त्रासदायक ठरते. मग या त्रासापासून सुटका हवी असल्यास काही घरगुती आणि सहज-सोप्या पद्धतींदेखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. हे घरगुती उपाय तुमच्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत करतात.
मसाज
तुमच्या डोळ्यांभोवती दिवसातून 2-3 वेळेस किमान 20 सेकेंद हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्यासोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यासही मदत होते.
हाताच्या तळव्यांचा स्पर्श
योगविद्येमध्ये या साधनेला विशेष महत्त्व आहे. हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा. 2-3 मिनिटांनंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.
'या' राशीच्या लोकांच्या मनातल्या इच्छा होणार पूर्ण; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
थंड दूध
डोळ्यांवरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. 4-5 मिनिटांनी तुम्हांला रिलॅक्स वाटेल. तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते. तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
काकडी
काकडीमध्ये कुलिंग इफेक्ट असल्याने अनेकदा सलूनमध्ये फेसपॅक लावल्यानंतर डोळ्यावर काकडी ठेवली जाते. काकडीमधील अॅस्ट्रींजंट घटक डोळ्यांवरील ताण हलका करतात. काकडीचे काप 3-4 मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळ आराम करा.
कापसाला 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची मागणी
गुलाबपाणी
नैसर्गिकरित्या थंड प्रवृत्तीचे गुलाबपाणी डोळ्यांमधील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यातील अॅस्ट्रिजंट आणि दाहशामक घटक डोळ्यांवरील ताण हलका करण्यास मदत करतात. गुलाबपाण्यात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. 4-5 मिनिटांनी काढून चेहरा हलकसा पुसा.
महत्वाच्या बातम्या
मिश्र मत्स्यपालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; होईल लाखों रुपयांचे कमा
गांडूळ खत निर्मितीसाठी या पद्धतींचा वापर करा; खर्च आणि वेळेची होईल बचत
आनंदाची बातमी! सौर पंप खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान
Published on: 29 October 2022, 12:51 IST