Health

आहारामध्ये कुठल्याही प्रकारच्या कडधान्याचा वापर केला तर ते खूपच फायदेशीर ठरते. बरेच जण आहारामध्ये मुगडाळ, तूर डाळ, चवळीची डाळ इत्यादींचा समावेश करतात. जर आपण या डाळिमध्ये विचार केला तर उडदाची डाळ बऱ्याच जणांना खायला आवडत नाही. परंतु या डाळीचे जर आरोग्याला होणारे फायदे पाहिले तर नक्कीच तुम्हाला सुद्धा उडदाची डाळ आवडायला लागेल.

Updated on 04 November, 2022 9:03 AM IST

आहारामध्ये कुठल्याही प्रकारच्या कडधान्याचा वापर केला तर ते खूपच फायदेशीर ठरते. बरेच जण आहारामध्ये मुगडाळ, तूर डाळ, चवळीची डाळ इत्यादींचा समावेश करतात. जर आपण या डाळिमध्ये विचार केला तर उडदाची डाळ बऱ्याच जणांना खायला आवडत नाही. परंतु या डाळीचे जर आरोग्याला होणारे फायदे पाहिले तर नक्कीच तुम्हाला सुद्धा उडदाची डाळ आवडायला लागेल.

जिभेचे चोचले पुरवण्या शिवाय आरोग्याच्या दृष्टिकोनातून उडदाच्या डाळीचे सेवन करणे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या लेखात आपण या डाळीचे आरोग्य विषयक फायदे जाणून घेऊ.

नक्की वाचा:Health Tips: चवळी एक आणि आरोग्यासाठी फायदे अनेक, वाचा डिटेल्स

 उडदाच्या डाळीचे आरोग्याला होणारे फायदे

1- हाडांसाठी असते महत्त्वपूर्ण- जर आपण वरच्या काळ्या सालीची उडदाची डाळ खाल्ली तर ती हाडांसाठी खूप फायदेशीर असून त्यामध्ये असलेले पोटॅशियम, कॅल्शियम तसेच फॉस्फरस यासारख्या पोषक तत्त्वांनी ती समृद्ध असल्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

2- हृदयाच्या आरोग्यासाठी- उडदाच्या डाळीमध्ये जे काही पोटॅशियम असते त्यामुळे रक्तवाहिन्या आणि धमण्यांमधील ताण कमी होतो आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

3- रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी- डायटरी फायबर चे प्रमाण यामध्ये जास्त असल्यामुळे उडीद डाळ ब्लड शुगर लेव्हल नियंत्रण ठेवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे डायबिटीस रुग्णांसाठी उडदाची डाळीचा आहारात वापर करणे खूप फायदेशीर ठरते.

नक्की वाचा:थंडीत रिकाम्यापोटी 'या' 6 गोष्टींचा आहारात समावेश करा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त

4- पचनाशी संबंधित समस्या असतील तर पडते उपयोगी- बऱ्याच व्यक्तींना पचनाशी संबंधित समस्या असतात. यामध्ये देखील उडदाची डाळ खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. यामध्ये विरघळणारे फायबर असल्यामुळे जे पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करते आणि अघुलनशील फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

5- विविध प्रकारच्या वेदना आणि सूज मध्ये उपयुक्त- उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे वेदना आणि सूज कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

तसेच स्नायू आणि सांधेदुखी कमी करण्यास देखील फायदेशीर ठरते.

( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीची व्यक्तिगत आणि कृषीजागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठलाही उपचार करण्याअगोदर आणि आहारात बदल करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

नक्की वाचा:Health Tips: तोंड येण्याची समस्या आहे का? करा 'हे' घरगुती उपाय नक्कीच मिळेल आराम, वाचा डिटेल्स

English Summary: urad daal is so importand and get many important benifit to health and fitness
Published on: 04 November 2022, 09:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)