दुचाकी खरेदीचा प्लॉन करत असल्यास तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात टू व्हिलरच्या किंमती गगनाला बिडल्या ाहेत, मात्र लवकरच या किंमती कमी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मोदी सरकाार आगामी बजेटमध्ये याबाबत मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे खिसे रिकामे झाले. नोकऱ्या गेल्या. उद्योग-धंदे बंद झाली. त्याचा परिणाम वाहन उद्योगावरही झाला. त्यात वाहनांच्या किंमतीत भरमसाठ वाढल्याने अनेकांनी नवी दुचाकी घेण्याऐवजी जुन्या दुचाकीवर तब्बल 28 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे आधी नवी दुचाकी घेण्यास इच्छुक नसायचे. अलिशान कारसाठी जितका जीएसटी आकरला जातो तितकाच दुचाकीसाठी आकारला जातो. फेडरेशन ऑफ ऑटोमाबाईल डिलर ही संघटना देशातील 15 हजार हुन अधिक ऑटोमोबाईल डिलर्सचे प्रतिनिधीत्व करते. या संघटनेने टू- व्हिलरवरील जीएसटी दर 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती वित्त मंत्रालयाला केली आहे.
हेही वाचा : जाणून घ्या जानेवारी महिन्यात जास्त प्रमाणात का खोदल्या जातात विहिरी, हे आहे कारण
दुचाकी लक्झरी उत्पादन नाही
दुचाकी हे काही लक्झरी उत्पादन नाही. चैनीची वस्तू म्हणू कोणीही दुचाकीचा वापर करीत नाही. सर्वसामान्य लोक दैनंदिन कामासाठी दुचाकी वापरतात. त्यामुळे दुचाकीवरील 28 टक्के जीएसटीसह 2 टक्के उपकर लावणे योग्य नाही. लक्झरीयस उत्पादनांवर सेस लावल जात असल्याने एफएडीएस ने म्हटलं आहे. मागील काही दिवसांत कच्चाा मालाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यात जीएसटी चा मोठा भार पडल्याने वाहन उद्योग निर्मिती करणाऱ्या कंपन्यांही दुचाकीच्या किंमतीत मोठी वाढ करावी लागली. दुचाकीच्या किंमती वाढल्याने मागणीत मोठी वाढ घट झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान येत्या1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीताराम या 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटमध्ये टू व्हिलर वरील जीएसटी दर 18 टक्क्यापर्यंत कमी करण्याची विनंती संघटनेने केली आहे. दरम्यान मोदी सरकार दुचाकीवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतल्यास गाड्यांच्या किंमती बऱ्याच कमी होऊ शकतात. त्यामुळे मोदी सरकारच्या आगामी बजेटकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.
दहा वर्षात सर्वात कमी विक्री एप्रिल ते डिसेंबर 2009 या काळात दुचाकी विक्रीने गेल्या 10 वर्षातील निच्चांकी पातळी गाठली 2020 च्या तुलनेत एप्रिल ते डिसेंबर 2021 मध्ये फारच कमी दुचाकींची विक्री झाली. मात्र या काळात प्रवाशी कार व प्रीमियम कारच्या विक्रीत वाढ झाल्याचे एसआयएस च्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.
Published on: 28 January 2022, 02:17 IST