आपल्या रोजच्या आहारामध्ये हळद आणि लिंबू ठरलेले असते. आहारात तर आहेच पण आपल्या शरीरासाठी याचे किती फायदे आहेत ते तुम्हाला माहीत आहे का? हळद आणि लिंबाचे एकत्र सेवन केल्यास आपले शरीर निरोगी राहते आणि अनेक आजराच्या समस्या दूर होतात. अगदी सांध्याच्या समसेपासून ते पचनक्रिया चांगली होईपर्यंत याचे फायदे आहेत. आपल्याला शरीरातील लिव्हर असो किंवा शरीराला हानी पोहचवणारे अपायकारक पदार्थ असो या सर्वांसाठी लिंबू आणि हळद उपयोगी ठरते. आज आपण लिंबू व हळद सेवन करण्याचे फायदे पाहणार आहोत.
हळद आणि लिंबाचे फायदे :-
१. यकृतातील अपायकारक पदार्थ काढून टाकणं :-
लिंबू आणि हळदीचे सेवन केले की आपल्या लिव्हर च्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण बऱ्या होतात तसेच शरीरात जेवढे विषारी द्रव्य साठले आहे ते बाहेर टाकून शरीर स्वच्छ करण्याचे काम हळद आणि लिंबू करत असते. जर तुम्हाला लीव्हर संबंधित ज्या समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसामध्ये हळद व थोड्या प्रमाणात मध टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण करा आणि त्याचे सेवन करा यामुळे लिव्हर पण चांगले राहील आणि पचनक्रिया पण सुधारेल.
२. लठ्ठपणा दूर करते :-
तुमचे पोट सुटले असेल म्हणजेच तुम्ही लठ्ठपणा समस्यातून मुक्त होयचे असेल तर रोज सकाळी लिंबाच्या रसामध्ये हळद आणि मध टाकून सेवन करावे. यामुळे लठ्ठपणा लवकरच कमी होईल तसेच तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया व्यवस्थित राहील.
३. त्वचा सुंदर बनवा :-
आपली त्वचा सुंदर बनवायची असेल तर त्यासाठी लिंबू आणि हळद फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही दररोज जर लिंबाच्या रसात हळद मिक्स करून तो रस पिला तर त्वचेसबंधी जेवढ्या समस्या आहेत त्या दूर होतील. तसेच या दोन्ही चे चांगले मिश्रण करून फेस मास्क म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता.
४. हृदयासाठी चांगलं
लिंबू आणि हळदीचे तुम्ही सेवन करत असाल तर ह्दयविकाराची समस्याही दूर राहते तसेच हृदयात ब्लॉकेजची समस्या असेल तर ती सुद्धा नीट होते. तसेच तुम्ही नर याचे नियमित सेवन करत असाल तर तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती आणि संसर्गजन्य आजार सुद्धा टाळले जातात.
5. मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर
तुम्हाला रोजच्या कामाचा ताणतणाव जाणवत असेल तर त्यासाठी लिंबाचा रस आणि हळदीचे पाणी या दोन्हींचे मिश्रण करून प्यायल्याने ताणतणाव कमी होतो आणि मूड सुद्धा फ्रेश राहतो. लिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट चे प्रमाण असल्यामुळे आपल्या मानसिक समस्या दूर ठेवण्याचे काम करते.
Published on: 24 January 2022, 01:51 IST