Health

तुळस म्हणजे 'वनस्पती लहान पण गुण महान असे आहे. तुळशीची पाने ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पाने उष्ण असतात म्हणून ती कफ दोषामध्ये वापरतात. ही पाने आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.

Updated on 25 June, 2021 8:27 PM IST

तुळस म्हणजे 'वनस्पती लहान पण गुण महान असे आहे. तुळशीची पाने ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पाने उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पाने आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.

याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजे, जळजळ, पायांची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे, रक्ती मूळव्याध, इत्यादींकरता घेतात. ह्या बिया दूध, किंवा तुपाबरोबर घ्याव्यात. 20 ते 30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एका वेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीन चार वेळा करावे.

 

सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे -

एक कप तुळशीची पाने पाच मिनिटे पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळावी. याचा 20 मि.ली. म्हणजे साधारण अर्धा कप, इतका रस काढावा.

इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी. हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होतो.

लेखक - मनोहर पाटील
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: tulsi is a special remedy for cold and cough
Published on: 25 June 2021, 08:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)