Health

आजच्या धावपळीच्या काळात आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे ठरले आहे, आहारासमवेतच फळाहार करणे देखील गरजेचे असते. गाजर हे एक खूप चवीष्ट फळ आहे. गाजर सेवन केल्याने मानवी शरीराला खूपच आश्चर्यकारक फायदे होतात.गाजर खुप पौष्टिक फळ आहे आणि याचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. गाजर मध्ये पोटॅशियम तसेच व्हिटॅमिन भरपुर प्रमाणात आढळतात. गाजर मध्ये मुख्यता व्हिटॅमिन ए आणि सी आढळतात. असे सांगितले जाते की गाजर असाच खाण्यापेक्षा त्यांचा ज्युस खाल्ल्यास अधिक फायदा शरीराला मिळत असतो. याचा ज्युस पिल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

Updated on 19 December, 2021 9:35 PM IST

गाजरचा ज्यूस पिल्याने डोळे स्वस्त राहतात तसेच यामुळे त्वचेला ग्लो येतो. गाजरच्या ज्युस मध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण अधिक असते. गाजरात कॅरोटेनोइडस नावाचा घटक असतो तसेच हे एन्टीऑक्सिडेंट म्हणुन काम करते. गाजर मध्ये असलेल्या कैरीटीनॉयड बीटा केरोटीन या घटकमुळे गाजरला नारंगी कलर येतो. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया गाजरचे फायदे.

•मित्रांनो जसं की आपण आधीच बघितलं की,गाजर मध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण हे अधिक असते, जे की अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ति कमालीची वाढते.

•ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी- ज्या लोकाना मधुमेहाचा त्रास आहे, त्या लोकांनी काय गाजरचा ज्यूस थोड्याश्या प्रमाणात सेवन केला पाहिजे. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित होण्यास मदत होते.

•गाजरचा ज्यूस मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच एंटीऑक्सीडेंट देखील भरपूर प्रमाणात असतात यामुळे गाजर सेवन केल्याने आपल्या त्वचेला एक वेगळा ग्लो प्राप्त होतो.

Tip-सदरच्या आर्टिकलं मध्ये दिलेली माहिती, सल्ल्यासह, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे वैद्यकीय उपचार म्हणुन घेऊ नका. अधिक माहितीसाठी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कृषी जागरण मराठी याची जबाबदारी घेत नाही, हे केवळ माहिती म्हणुन उपयोगात आणा.

English Summary: Tremendous Benifits of carrot juice
Published on: 19 December 2021, 09:35 IST