टोमॅटो भारतीय स्वयंपाक घरात सहजरीत्या उपलब्ध होणारे पालेभाजीपैकी एक आहे. टोमॅटो जेवणाचा स्वाद वाढवते याव्यतिरिक्त यामध्ये असणारे औषधी घटक मानवी आरोग्यासाठी खुप फायदेशीर असल्याचे सांगितलं जाते. टोमॅटोची भाजी चटणी सूप इत्यादी पद्धतीने सेवन केले जाते. याव्यतिरिक्त टोमॅटोला कच्चेच सलाद म्हणून देखील खाल्ले जात असते. टोमॅटो मध्ये विटामीन सी विटामीन ए यांसारखे विटामिन आढळतात, तर कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी खनिज देखील मुबलक मात्रामध्ये आढळतात.
टोमॅटो मध्ये असणारे हे पौष्टिक घटक मानवी शरीरास खूप फायदेशीर असतात यामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत होते. आहार तज्ञांच्या मते, सकाळी आनाशेपोटी टोमॅटोचे सेवन केल्यास, मानवी आरोग्य सदृढ ठेवले जाऊ शकते. आपण टोमॅटोचे सेवन टोमॅटोचे विविध पदार्थ बनवून करू शकता किंवा टोमॅटोचा ज्यूस देखील आपण सकाळी आनाशेपोटी सेवन करू शकता. आज आपण सकाळी अनाशेपोटी टोमॅटोचे सेवन केल्यास मानवी आरोग्यास मिळणारे फायदे जाणून घेणार आहोत.
सकाळी-सकाळी टोमॅटोचे सेवन केल्यास मानवी आरोग्याला मिळणारे फायदे
इम्म्युनिटी वाढविण्यासाठी फायदेशीर
कोरोना जगात आल्यापासून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक लोक प्रयत्नरत असतात. तेव्हापासून रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व मोठे वाढले आहे. अशा परिस्थितीत, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही टोमॅटोची मदत घेऊ शकता. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे शरीरातील विटामिन सी ची कमतरता पूर्ण करण्यास टोमॅटो मदत करत असते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे मित्रांनो सकाळी रिकाम्यापोटी टोमॅटोचा रस प्या आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवा आणि निरोगी रहा.
मानवी शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत करते
मित्रांनो जर आपण लठ्ठपणाचा शिकार असाल अथवा शरीराच्या वाढत्या वजनामुळे चिंताग्रस्त असणार तर आपण शरीराचे वजन कमी करण्यासाठी सकाळी सकाळी रिकाम्यापोटी टोमॅटोचे सेवन करू शकता. अनेक आहार तज्ञ वजन कमी करण्यासाठी सकाळी सकाळी टोमॅटोचा ज्यूस दोन ग्लास पिण्याचा सल्ला देत असतात. टोमॅटोचे ज्यूस सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते या शिवाय टोमॅटोची साल देखील खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण की टोमॅटोच्या सालीत फाइटोकेमिकल्स असतात जे की मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात.
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी
मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव अर्थात डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि डोळ्यांची नजर अथवा दृष्टी वाढवण्यासाठी डॉक्टर हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी टोमॅटोचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी सकाळी रिकाम्यापोटी टोमॅटोचे सेवन करणे खुपच फायद्याचे असल्याचे सांगितले जाते. टोमॅटोच सेवन केल्याने डोळ्यांनाच नाही तर त्वचेलाही फायदा होतो. असे सांगितले जाते की, सकाळी सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटोचा रस प्यायल्याने त्वचेचे अनेक विकार दुर केले जाऊ शकतात याशिवाय त्वचेला खुप चांगला ग्लो येत असतो.
Published on: 27 February 2022, 01:50 IST