Health

धुळ ॲलर्जी ही एक प्रतिक्रिया आहे जेव्हा शरीरात धुळीमध्ये असलेल्या धूलिकणांचे श्वास घेतो तेव्हा. या ऍलर्जीमुळे नाक वाहणे, शिंका येणे, ताप येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. धुळीची ऍलर्जी असणे हे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याचे लक्षण आहे.

Updated on 15 June, 2022 10:15 PM IST

 धुळ ॲलर्जी ही एक प्रतिक्रिया आहे जेव्हा शरीरात धुळीमध्ये असलेल्या धूलिकणांचे श्वास घेतो तेव्हा. या ऍलर्जीमुळे नाक वाहणे, शिंका येणे, ताप येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. धुळीची ऍलर्जी असणे हे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याचे लक्षण आहे.

  रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेले लोक अशा गोष्टींना बळी पडत नाही. जर तुम्हाला नियमितपणे धुळीच्या अलर्जी होत असेल तर ते कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती चे लक्षण असू शकते. आपली जीवनशैली, आहार  आणि व्यायामाची दिनचर्या या सर्वांनी आपली

प्रतिकारशक्ती मजबूत करण्यातकिंवा कमकुवत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.सुपरफुड्स हे असे पदार्थ असतात ज्यांचे पोषणमूल्ये जास्त असते आणि शरीरावर कमी किंवा नकारात्मक प्रभाव पडत नाही. या लेखामध्ये अशाच काही सुपरफूडची माहिती घेऊ जी धुळीच्या अलर्जी वर फायदेशीर ठरू शकतात.

नक्की वाचा:Health Menu:भाजलेल्या कांद्यांचे असेही आहेत आरोग्याला फायदे, वाचून वाटेल आश्चर्य

धुळीची ॲलर्जी कमी करण्यासाठी असलेल्या सुपरफूड

1- दालचिनी- जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायचे असेल किंवा एलर्जी ची लक्षणे कमी करायचे असतील तर दालचिनीचे सेवन हे एक महत्त्वपूर्ण ठरू शकते.

2- नट- उच्च पौष्टिक मूल्य असलेल्या नट्समध्ये बदाम,काजू आणि अक्रोड यांचा समावेश होतो. हे नुसते प्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर जळजळ कमी करण्यास देखील मदत करतात.

3- टोमॅटो -टोमॅटोमध्ये लायकोपीन असते. जे त्यांना चमकदार लाल रंग देते. लायकोपीन एक अँटिऑक्सिडंट असून आपल्या पेशींचे संरक्षण आणि बरे करण्यास मदत करते.

4- आले- आले सुद्धा यामध्ये एक उपयुक्त असून प्रसिद्ध गुणधर्म असलेले एक सुप्रसिद्ध सुपरफुड आहे.  धुळ ऍलर्जीमुळे रक्त संचय जळजळ होते त्याला आद्रक मुळे आराम मिळतो.

नक्की वाचा:निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी 'हे' पदार्थ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी खा !

5- कांदे- कांद्यामध्ये क्वेसर्टिन नावाचा पदार्थ असतो. हा घटक हिस्टामाईनचे उत्पादन कमी करण्यास मदत करते. हिस्टामाईन हे एक रसायन आहे जे शरीर ऍलर्जीच्या प्रतिसादात तयार करते ज्यामुळे जळजळ, रक्त संचय आणि इतर लक्षणे उद्भवतात.

6- लसुन- लसुन हा एक भारतीय आणि दक्षिण आशियाई पाककृतीमध्ये एक लोकप्रिय सुपरफुड आहे. यात उत्कृष्ट दाहक विरोधी आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत.

7- चिकन- चिकन मध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते आणि ती रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा पातळी वाढण्यास मदत करते.

 आहारातील लहान-लहान बदलांमुळे बाह्य रॅडिकल्सशी लढण्याचे तुमची रोगप्रतिकारक शक्ती लक्षणीयरीत्या सुधारू शकते.

नक्की वाचा:Sugarcane juice: या समस्या असल्यास चुकूनही पिऊ नका ऊसाचा रस, नाहीतर होईल नुकसान

English Summary: thise superfood is give comfort from dust alergy
Published on: 15 June 2022, 10:15 IST