मांसाहारप्रेमीमध्येही सीफुड्स म्हणजेच मासे खाणाऱ्यांचा एक खास वर्ग आहे प्रत्येक माशांची चव वेगळी असते त्याचे आरोग्याला होणारे फायदे ही वेगवेगळे आहेत.
मुंबईत एका मच्छीमारांच्या जाळ्यात भलामोठा गोड मासा अडकला बाजारात या माशांची विक्री सुमारे 5.5 लाखांना झाले आहे.
घोळ मासा हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार यांना तो फार आवडतो या माशाचा मधला काटा (मनक्याचा भाग) खवय्ये अतिशय चवीने खातात त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो.
- घोळ मासा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
1)घोळ मासातील डीएचए अअणि इपीए घटक लहान मुलांच्या आरोग्याला फायदेशीर आहे सोबतच त्यामुळे रक्तदाबाची समस्या आटोक्यात राहते.
2) घोळ माशात ओमेगा 3 घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदेशीर आहे त्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते मुबलक प्रमाणात omega-3 घटक असल्याने मेंदूच्या कार्याला नसांना त्यांचा फायदा होतो.
3) त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी घोळ मासा फायदेशीर आहे अकाली चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याचा त्रास कमी होतो त्वचा मुलायम राहते.
4) शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा-3 ऍसिड मदत करते त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते.
5) घोळ माशा तील विटामिन, खनिज' प्रोटीन घटक डोळ्यांचं आरोग्य जपायला मदत करते दीर्घकाळ दृष्टी उत्तम राहण्यासाठी मदत होते.
6) मसल्स टोन करण्यासाठी त्यांना मजबुती देण्यासाठी घोळ मासा अत्यंत फायदेशीर आहे याद्वारा शरीराला उत्तम प्रतीच्या विटामिन्स चा पुरवठा होतो.
7) पचन संस्था उत्तम ठेवण्यासाठीही घोळ माशांचा आहारातील समावेश फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Cotton: मे महिन्यात यावेळी लागवड करा कापुस आणि मिळवा दर्जेदार उत्पादन
नक्की वाचा:कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान
Published on: 04 May 2022, 03:35 IST