Health

सध्या बरेच लोक जास्त वजनाच्या समस्याने त्रस्त आहेत. जास्त वजन झाल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. बरेच जण आहारामध्ये बदल किंवा बऱ्याच प्रकारचे निरर्थक प्रयत्न करून थकतात, परंतु हव्या त्या प्रमाणात रिझल्ट येत नाही. परंतु आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश केला तर वजन कमी होण्यासाठी मदत होते. या लेखामध्ये आपण अशाच काही उपयुक्त सूप आहेत ज्यांचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो, त्याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 31 July, 2022 12:58 PM IST

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त सूप

1- पालकाचे सूप- पालक सूप वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते तसेच ते आरोग्यासाठी देखील खूप उत्तम आहे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही पालक सूप चा समावेश केला तर तो फायदेशीर ठरतो.

नक्की वाचा:Health Tips: खरं काय! तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने 'या' गंभीर आजारांपासून मिळणार आराम

2- गाजर सूप- गाजर सूप देखील पौष्टिक असून वजन कमी करण्यासाठी ते प्रभावीपणे उपयुक्त ठरते. यामध्ये असलेल्या विटामिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून गाजर सुपचा आहारात समावेश केल्यास शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

3- भोपळा- लसूण सूप- भोपळा आणि लसूण मिक्स करून बनवलेले सूप वजन कमी करण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे.हे कमी कॅलरी सूप असून पचायला खूप हलके आहे. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

नक्की वाचा:Health Tips: राहायचे असेल चाळिशीनंतर फिट आणि फाईन तर घ्या 'अशा' पद्धतीचा आहार आणि रहा तंदुरुस्त

4- कोबीचे सूप- वजन कमी करण्यासाठी कोबी सुपचा वापर करता येतो. यामुळे पोट तर भरतेच परंतु सहजपणे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करण्याची यामध्ये ताकत आहे.

5- दुधी भोपळ्याचे सूप- हे सूप लवकर वजन कमी करण्यासाठी साहाय्यभूत ठरते. यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात व ते पचायला सुद्धा सोपे असते.

( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीची व्यक्तिगत रित्या आणि कृषीजागरण समूह सहमत असेलच असे नाही. आहारात बदल करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

नक्की वाचा:Superfood: 'हे' सुपरफुड शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि करतो बचाव कॅन्सरपासून,वाचा माहिती

English Summary: this type of vegetable soup is do help in weight loss
Published on: 31 July 2022, 12:58 IST