Health

किडनी हा एक आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असून शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठीत्यासोबतच लघवीद्वारे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याच्या देखील काम किडनी द्वारे केले जाते.एवढेच नाही तर इलेक्ट्रोलाईट ची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम देखील किडनी करते.

Updated on 03 March, 2022 7:47 PM IST

 किडनी हा एक आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असून शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठीत्यासोबतच लघवीद्वारे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याच्या देखील काम किडनी द्वारे केले जाते.एवढेच नाही तर इलेक्ट्रोलाईट ची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम देखील किडनी करते.

किडनीमध्ये असलेले लाखो स्वरूपाचे फिल्टर रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतात.त्यामुळे अतिमहत्त्वाच्या या शरीरातील भागाकडे लक्ष पुरवणे फार गरजेचे आहे.किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैलीत आरोग्यदायी बदल करणे व आहार संतुलित ठेवणे फार आवश्यक आहे.सध्या जंकफूड सेवनाचे प्रमाणात जास्त प्रमाणात वाढले आहे.त्यासोबतचफास्ट फूडतेलकट पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढल्याने किडनी फॅटीहोऊ शकते.जेव्हा काही कारणास्तव किडनीचे काम संतुलित रित्या  करणे बंद होते तेव्हा शरीरावर त्याची काही लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे अशा लक्षणांकडेवेळीच लक्ष पुरवणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण काही लक्षणे जाणून घेऊ.

 किडनी नीट काम करत नसल्यास ती सतत शरीरातही लक्षणे

  • भूक लागणे आणि वजन कमी होणे- किडनी निकामी झाल्यामुळे भूक कमी होतेआणि रुग्णाचे वजन झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते.किडनीचे समस्या निर्माण झाली तर रुग्णाला नेहमी पोट भरल्यासारखे वाटते.
  • पायांना सूज येणे-शरीरामधील अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्याचे काम किडनी करते.किडनीचे काम करणे बंद झाल्यामुळेशरीरामध्ये सोडियम जमा व्हायला सुरुवात होते त्यामुळे पायांना सूज येऊ शकते.तसेच त्याचा परिणाम डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर दिसून येतो पण याचा जास्त परिणाम पायांवरहोतो.
  • त्वचेवर कोरडी खाज सुटते-किडनीमध्ये समस्या निर्माण झाल्यास त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो.ज्यामुळे त्वचा कोरडी होते व तीला खाज सुटते.
  • झोप न लागणे आणि अस्वस्थता निर्माण होणे- ज्या लोकांना किडनीचे  समस्या निर्माण होते त्यांच्या झोपेच्या देखील समस्या निर्माण होते व झोपेच्या कमतरतेमुळे अस्वस्थता जाणवते.
  • लघवी जास्त प्रमाणात होणे-मूत्रपिंड यामध्ये समस्या निर्माण झाल्यास लघवी वर त्याचा परिणाम होतो.जर आपण सहसा पाहिले तर आठ ते दहा वेळेस लघवी दिवसातून होते. परंतु यापेक्षा जास्त वेळा लघवी होणे किडनीमध्ये काही समस्या निर्माण होण्याचे लक्षण असू शकते.कधीकधी लघवीत जळजळ आणि रक्तस्राव होण्याची समस्या देखील पाहायला मिळते.(स्रोत-z24 तास)

( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून ती वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत.या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण टीम सहमत असेलच असे नाही)

English Summary: this symptoms is show in body when kidney fail so take precaution
Published on: 03 March 2022, 07:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)