Health

आरोग्याच्या विविध प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. व्यक्ती कुठल्याही वयोगटाची असली तरी आरोग्याच्या समस्या निर्माण होतातच. आरोग्याची कुठलीही समस्या निर्माण होण्याअगोदर शरीरामध्ये किंवा शरीरावर कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसतात. म्हणजे नॉर्मल स्थितीपेक्षा काही वेगळी चिन्हे किंवा लक्षणे दिसायला लागताच आपण समजतो की काहीतरी झाले आहे.

Updated on 17 September, 2022 2:42 PM IST

आरोग्याच्या विविध प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. व्यक्ती कुठल्याही वयोगटाची असली तरी आरोग्याच्या समस्या निर्माण होतातच. आरोग्याची कुठलीही समस्या निर्माण होण्याअगोदर शरीरामध्ये किंवा शरीरावर कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसतात. म्हणजे नॉर्मल स्थितीपेक्षा काही वेगळी चिन्हे किंवा लक्षणे दिसायला लागताच आपण समजतो की काहीतरी झाले आहे.

आता या सगळ्या आजारांच्या बाबतीत जर आपण हृदय रोग अर्थात हार्टअटॅकचा विचार केला तर अगदी 30 ते 40 वयोगटातील व्यक्तींना सुद्धा हल्ली हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

नक्की वाचा:सावधान! 'या' कारणाने होऊ शकतो तुम्हाला डायबीटीस; अशी घ्या काळजी

यामागे आपले दैनंदिन रुटीन, कामाचा व्याप आणि ताण-तणाव, आपली आहार पद्धती कारणीभूत आहे. परंतु हार्टअटॅक येण्याअगोदर  जवळजवळ एक महिना आधी शरीरामध्ये काही संकेत मिळतात व याकडे जर वेळीच लक्ष दिले तर नक्कीच आपण हार्ट ॲटॅक पासून वाचू शकतो.

हार्टअटॅकमध्ये काही जणांना 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ छातीमध्ये दुखते तर काही लोकांना हलक्या वेदना होतात.  परंतु काही जणांना तीव्र स्वरूपाच्या वेदना देखील जाणवतात. त्यामुळे या लेखात आपण हार्ट ॲटॅक येण्याआधी कुठल्या लक्षणे दिसतात हे आपण पाहू.

नक्की वाचा:Health Tips : अद्भुत! दररोज या फळाचे सेवन करा, आरोग्याला होणार हे आश्चर्यकारक फायदे

 हार्टअटॅकची काही सामान्य लक्षणे

 त्यामध्ये काही सामान्य लक्षणे देखील आहेत जसं की, अस्वस्थता वाटणे, छातीमध्ये दुखणे किंवा दरदरून घाम येणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. परंतु बऱ्याचदा आपण याकडे दुर्लक्ष करतो व बऱ्याचदा वेदनाशामक गोळ्या अर्थात पेन किलर घेऊन वेदना कमी करण्याचा आपला प्रयत्न असतो.

परंतु बऱ्याचदा ही सामान्य समस्या नसून हा एक सौम्य हृदय विकाराचा झटका असू शकतो. जेव्हा तीव्र स्वरूपाचा झटका येतो तेव्हा चक्कर येऊन खाली पडणे किंवा मृच्छा येणे किंवा छातीत तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे इत्यादी लक्षणे जाणवतात.

आपण सामान्यपणे विचार केला तर छातीत दुखणे, चक्कर येणे, अनियंत्रित ब्लडप्रेशर, श्वास घ्यायला अडचण होणे, कायमच थोडे जरी काम केले किंवा चालले तरी थकवा जाणवणे,  छातीत धडधड वाढणे इत्यादी सामान्य लक्षणांकडे देखील दुर्लक्ष करू नये. त्यामुळे अशी लक्षणे दिसून येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घेणे खूप आवश्यक आहे.

नक्की वाचा:सावधान! ॲसिडिटीचा सतत त्रास होतोय? तर हृदयविकाराची असू शकतात लक्षणे...

English Summary: this is symptoms is mainly give indication to heart attack so dont avoid
Published on: 17 September 2022, 02:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)