शरीराच्या आरोग्यासाठी अनेक वेगळ्या प्रकारची उपाययोजना तसेच आहारामध्ये देखील वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केला जातो. कारण प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये असलेल्या पोषक घटकांचे प्रमाण हे वेगळे असते. या पद्धतीने जर आपण हरभरा एखादं याचा विचार केला तर मोड आलेला हरभरा यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. हरभऱ्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे तसेच प्रथिने आणि फायबरमुळे वजन देखील कमी करतो. या लेखामध्ये आपण मोड आलेल्या हरभऱ्याचे शरीरासाठी होणारे उपयोग जाणून घेऊ.
मोड आलेल्या हरभऱ्याचे शरीरासाठी होणारे उपयोग
1- बरेच आहार तज्ञांचे म्हणणे आहे की हरभऱ्यामध्ये असलेले प्रोटीन आणि फायबर मुळे त्यामध्ये कॅलरीज कमी असतात व त्यामुळे भूक संतुलित राहण्यास मदत होते. हे एक कमी कॅलरी असलेले अन्नपदार्थ असून भिजवलेले हरभरे खाल्ल्याने पोट साफ राहते.
2- हरभऱ्यामध्ये लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण असल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते व रोज खाल्ल्यामुळे अशक्तपणा देखील दूर होतो.
3- तसेच आळस आणि थकवा दूर करण्यासाठी देखील रोज अंकुरलेले हरभरे खाणे चांगले आहे.यामुळे नेहमी उत्साही राहता येते.
4- तसेच भिजवलेले हरभरे खाल्ल्यामुळे त्यात असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. त्या सोबतच काही व्यक्तींना वारंवार लघवीचा त्रास होतो. हा त्रास देखील यामुळे कमी होतो.
5- तसेच उपाशीपोटी हरभरे खाल्ल्यामुळे गुणवत्तेचे प्रमाण वाढत नाही व मधुमेह नियंत्रणात राहतो.
नक्की वाचा:Health Tips: 'या' 4 पालेभाज्या रोजच्या आहारात खा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
6- बऱ्याच व्यक्ती सध्या मानसिक तणावातून जात असतात अशा लोकांसाठी देखील हरभरा खूप उपयुक्त आहे.
7- काविळच्या रुग्णांसाठी देखील हरभरा महत्त्वाचा ठरतो.
8- अंकुरलेले हरभरे आणि मूग जर एकत्र मिसळून खाल्ले तर प्रथिनांचे प्रमाण वाढते.
9- हरभऱ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी देखील कमी राहते. कारण यामध्ये असलेले फायबर आणि प्रथिनांच्या चांगला स्त्रोत असल्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यासाठी देखील हरभरा ओळखला जातो.
10- तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते व चयापचय गतिमान होते. तसेच शरीर हे ऊर्जेसाठी चरबी वापरण्यास सक्षम होते. हरभऱ्यामध्ये असलेल्या लोहाच्या प्रमाण यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो.
नक्की वाचा:Health Tips : बापरे! जेवणानंतर लगेचचं नका करू हे काम, नाहीतर…
Published on: 06 October 2022, 08:14 IST