Health

सध्या ऍसिडिटी म्हटले म्हणजे अगदी 15 वर्षाच्या पुढील मुलांनादेखील ॲसिडिटीचा त्रास फार मोठ्या प्रमाणावर होतो.ही समस्या बऱ्याच जणांना दररोज त्रासदायक होऊन बसली आहे. त्यातच बऱ्याच जणांना थोडे जरी खाल्ले तरी गॅसेसचा फार मोठी समस्या उद्भवते. या दोन्ही गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यावर आणि कामावर ही खूप मोठा विपरीत परिणाम करतात. ऍसिडिटी साठी बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. अनेक प्रकारचे अँटासिड औषधे ऍसिडिटी साठी घेतली जातात.

Updated on 06 September, 2022 12:23 PM IST

परंतु त्यांचा तात्पुरता आराम मिळतो. या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी थोडासा जेवणात आणि दैनंदिन रूटीनमध्ये चेंज करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे जेवण करताना अन्नाचे कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये जर बदल केला तर ऍसिडिटी आणि गॅसपासून त्वरित मुक्ती मिळू शकते.

नक्की वाचा:मासिक पाळी अनियमित येण्याची 'ही' आहेत कारणे; जाणून घ्या सविस्तर

गॅस आणि ऍसिडिटी वर या छोट्या टिप्स

1- एकत्र दोन प्रकारचे जेवण- बऱ्याचदा आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा दोन पदार्थ सोबत खातो. यामध्ये उदाहरणच द्यायचे झाले तर डाळ भात, डाळ रोटी इत्यादी. परंतु असे पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे शरीराला ते पचायला जड जातात. परिणामी गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास संभवतो.

त्यामुळे तुम्ही जर एखाद धान्य खात असाल तर त्यासोबत भाजीपाला म्हणजेच भाज्या खाणे अधिक चांगले. समजा तुम्ही एक वाटी भात घेतला तर तीन वाट्या भाजी आणि एक रोटी सोबत दोन वाट्या भाज्यांचे सेवन करावे.

नक्की वाचा:Apple Side Effects : बापरे..! सफरचंद खाल्ल्याने आरोग्यावर होतात 'हे' दुष्परिणाम

2- जेवताना पाणी पिण्याची सवय- आपल्याला बर्‍याच जणांना जेवण करताना मध्ये पाणी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय चांगली नाही.  यामुळे अन्न पोटात जात नाही व व्यवस्थित पचत देखील नाही त्यामुळे देखील गॅस आणि ऍसिडिटी होते. त्यामुळे जेवण करायच्या अगोदर एक तास आणि नंतर फक्त पाणी प्यावे परंतु जेवताना पाणी प्यायचे असेल तर ते केवळ एक ते दोन घोट घ्यावे.संपूर्ण ग्लास संपवू नये.

( टीप- वरील माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. त्याच्याशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समोर सहमत असेलच असे नाही. कुठल्याही समस्येसाठी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

नक्की वाचा:नारळाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचून विश्वास बसणार नाही

English Summary: this is small tips is so important for relief from gases and acidity
Published on: 06 September 2022, 12:23 IST