Health

पाठ दुखी आणि कंबर दुखी चे प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळून येते. मात्र अलीकडे ही समस्या सर्वांकडे वाढली आहे.

Updated on 23 March, 2022 7:32 PM IST

पाठ दुखी आणि कंबर दुखी चे प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळून येते. मात्र अलीकडे ही समस्या सर्वांकडे वाढली आहे.

कारण कामाच्या ठिकाणी अनेक तास एकाच पोझिशनमध्ये बसावे लागते. शिवाय शरीराची हालचाल आणि व्यायामाचा अभाव यासह अनेक कारणे या पाठीमागे आहेत. पाठ आणि कंबर दुखी कडे दुर्लक्ष केल्यास मणक्याचा त्रास उद्भवून शस्त्रक्रियेपर्यंत प्रकरण जाऊ शकते.

नक्की वाचा:सिंचन अनुशेष निर्मूलन! विदर्भातील या विभागातील सिंचन अनुशेष निर्मूलनासाठी जून 2025 पर्यंत मुदतवाढ- जलसंपदामंत्री जयंत पाटील

2) ही आहेत कारणे :                  

1) आठ-नऊ तास एकाच जागी बसल्यामुळे पार्श्वभाग किंवा कंबर आणि पाठ त्यांच्यात वेदना होतात. हे दुखणं अनेक दिवस तसेच राहिल्यामुळे मोठा आजार होण्याची शक्यता असते.

2) तासनतास एकाच जागी बसून राहिल्यामुळे पाठीचे आणि कमरेचे दुखणे जाणवते.

3) व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्यात ताळमेळ नसणे.

4) शरीरातील पोषक घटकांची कमतरता यामुळे कंबर आणि पाठ दुखी चा त्रास सर्वाधिक सहन करावा लागतो.

5) प्रवासात जास्त वेळ बसून राहत असाल तर ही समस्या जाणवते.

3) हे उपाय करा:

1) चालताना किंवा बसताना पाठ सरळ राहील अशा स्थितीत बसा.

2) एकाच जागी बसून जास्त वेळ काम करत असाल तर ताठ बसणे गरजेचे आहे.

3) ऑफिस मध्ये काम करत असताना अधून मधून चालण्याची सवय ठेवा. ब्रेकच्या वेळेत चालू शकता.

नक्की वाचा:ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप होणार, ऊस शिल्लक राहणार नाही- सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

4) कंबर आणि पाठीचे दुखणे असलेल्या लोकांनी आहारात विटामिन डी3,सी, आणि कॅल्शियम तसेच फास्फोरस आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

5) आहारात माशांचा समावेश करा. यामुळे हाडे मजबूत होऊन कंबर, पाठ दुखणे पासून आराम मिळू शकतो.

6) आहारात डिंकाचे लाडू किंवा डिंकाचा समावेश करा.

English Summary: this is six remedy is useful in waist hurts do that and get comfort
Published on: 23 March 2022, 07:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)