सकाळी सकाळी पोट साफ होणे ही दिवसभरातील ताजेतवाने राहण्याची गुरुकिल्ली आहे.असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.परंतु जर सकाळी सकाळी पोट साफ होत नसेल तर दिवसभर कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही तसेच दिवसभर चिडचिड होत राहते यामुळे आपल्या दैनंदिन कामावर विपरित परिणाम होतो.
तसेच पोट साफ न होणे म्हणजे अनेक आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे. या समस्येने अनेक जण त्रस्त असतात. त्यामुळे सकाळी पोट साफ व्हायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही छोटेसे परंतु महत्वाचे घरगुती उपाय करणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:थंडीत रिकाम्यापोटी 'या' 6 गोष्टींचा आहारात समावेश करा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
रात्री झोपण्यापूर्वी करा हे घरगुती उपाय
1- यासाठी रात्री त्रिफळा चूर्ण मातीच्या भांड्यात भिजवून ठेवावी व त्याचे पाणी गाळून प्यायल्याने देखील पोट साफ होण्यास मदत होते.
2- मनुके घेऊन ते पाण्यात भिजवावे व या भिजवलेल्या मनुक्यांचे पाणी प्यावे आणि त्यासोबतच मनुका खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
3- तसेच दोन ते तीन अंजीर दुधामध्ये उकळून कोमट दूध आणि अंजीर खाल्याने देखील बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
4- तसेच ग्लासभर दुधामध्ये एक चमचा एरंडेल तेल मिसळून प्यावे. त्यामुळे देखील चांगला आराम मिळतो.
5- ग्लासभर कोमट पाण्यामध्ये दोन चमचे कोरफडीचा गर मिसळून पिले तरी फरक पडतो.
बद्धकोष्टता होऊ नये म्हणून काय करावे?
1- फास्ट फूड तसेच जंक फूड, बेकरीउत्पादने तसेच मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे.
2- जे पदार्थ पचायला जड आहेत ते अधिक खाणे टाळावे.
3- आहारामध्ये पालेभाज्या तसेच शेंगवर्गीय भाजीपाला तसेच विविध प्रकारच्या फळांचा समावेश करावा.
4- जेवण करताना घाई न करता अगदी सावकाश पद्धतीने जेवण करावे व प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा.
5- दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी प्यावे व नियमित व्यायाम करावा.
6- ज्या व्यक्तींना जास्त करून बैठे काम असते अशा लोकांनी रोज अर्धा तास चालणे किंवा पायऱ्या चढणे उतरणे इत्यादी क्रिया केल्याने पोटाचा व्यायाम होतो व बद्धकोष्ठता दूर होते.
( टीप- वरील माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केले आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठलाही उपचार करण्या अगोदर किंवा आहारात बदल करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Published on: 27 October 2022, 06:29 IST