Health

आपल्याला माहित आहेच की बऱ्याच व्यक्तींना खासकरून महिलावर्गाला धुळीची अलर्जी असते.म्हणजेच अगदी घराला झाडू जरी मारला तरी काही क्षणात शिंका आणि सर्दी होते. बऱ्याचदा डोळे लाल होतात किंवा हातापायांवर पूरळ देखील येतात व काहींना श्वास घेण्यास त्रास देखील व्हायला लागतो.ही समस्या बऱ्याच जणांना त्रासदायक ठरत आहे. यासाठी खूप जण वेगळ्या पद्धतीचे उपाय अवलंबतात. परंतु त्यामानाने हवा तेवढा फरक यामध्ये दिसून येत नाही.

Updated on 08 September, 2022 6:33 PM IST

आपल्याला माहित आहेच की बऱ्याच व्यक्तींना खासकरून महिलावर्गाला धुळीची अलर्जी असते.म्हणजेच अगदी घराला झाडू जरी मारला तरी काही क्षणात शिंका आणि सर्दी होते. बऱ्याचदा डोळे लाल होतात किंवा हातापायांवर पूरळ देखील येतात व काहींना श्वास घेण्यास त्रास देखील व्हायला लागतो.ही समस्या बऱ्याच जणांना त्रासदायक ठरत आहे. यासाठी खूप जण वेगळ्या पद्धतीचे उपाय अवलंबतात. परंतु त्यामानाने हवा तेवढा फरक यामध्ये दिसून येत नाही.

परंतु आपण या लेखाच्या माध्यमातून आज धुळीच्या अलर्जी पासून मुक्ती मिळवण्यासाठीचे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. त्यांच्या मदतीने तुम्हाला फरक जाणवू शकतो.

नक्की वाचा:Health Tips: हृदयविकाराचा झटका साधारणपर्यंत किती वेळा येऊ शकतो? जाणून घ्या सविस्तर

धुळीच्या अलर्जी पासून मुक्तीसाठी काही घरगुती उपाय

1-आहाराममध्ये दही ताक- जर तुम्ही आहारामध्ये दही, ताक व चीज यासारख्या पदार्थांचा समावेश केला तर आराम मिळू शकतो कारण ही सर्व प्रोबायोटिक्स आहेत.

या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते व धुळीच्या अलर्जीचा त्रास सहजासहजी होत नाही. त्यामुळे या पदार्थांचे सेवन अवश्य करावे.

2- मधाचा वापर- यामध्ये जैविक पद्धतीने वापरून तयार केलेले मधाचे सेवन खूप उपयुक्त ठरू शकते. धुळीच्या अलर्जीमुळे

जर तुम्हाला सतत शिंका किंवा खोकला यायला लागला तर दिवसातून तीन वेळा एक लहान चमचा मधाचे सेवन करणे गरजेचे आहे.  ऍलर्जीमुळे हात पायांवर पुरळ किंवा खाज सुटत  असेल तर अशा  भागावर मधाचा पातळ थर लावावा.

नक्की वाचा:Health Tips: टिप्स आहेत एकदम छोट्या, परंतु गॅस आणि ऍसिडिटी दूर करण्यास हमखास आहेत उपयोगी

3- निलगिरी तेल- निलगिरीचे तेल हे गरम पाण्यामध्ये टाकून त्याची वाफ जर घेतली तरीदेखील धुळीच्या अलर्जीमुळे उद्भवणारे सर्दी व खोकला पासून त्वरित आराम मिळतो.

4- पेपरमिंट घालून केलेला चहा- पेपरमिंट घालून केलेला चहा देखील या समस्येवर चांगला उपाय आहे. ऍलर्जीमुळे जर सर्दी खोकला झाला तर त्यावर हे अतिशय गुणकारी आहे.

हा चहा बनवण्यासाठी पेपरमिंटची वाळलेली पाने 250 मिली लिटर पाण्यामध्ये चांगली उकळून घ्यावीत व या तयार काढ्याचे सेवन दिवसातून थोडे थोडे सतत करीत राहावे.

5- ग्रीन टी- ग्रीन टीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट असल्यामुळे शरीरामध्ये एलर्जीची कोणत्याही प्रकारचे रिॲक्शन रोखण्यास मदत मिळते.

त्यासोबतच ऍलर्जीमुळे त्वचेवर येणारी लाली किंवा सुटणारी खाज ग्रीन टी च्या वापराने कमी होते.

( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे.  या माहितीशी व्यक्तिगत किंवा कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठल्याही उपचार करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

नक्की वाचा:Health Menu: 'या'गोष्टींची काळजी घेतली तर डायबिटीस राहू शकतो नियंत्रणात, वाचा सविस्तर

English Summary: this is important home remedy and give relief from dust allergy
Published on: 08 September 2022, 06:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)