तोंड येण्याची समस्या ही बऱ्याच जणांना असते. तोंडामध्ये एखादा फोड येणे यालाच आपण तोंड येणे असे देखील म्हणतो. परंतु तोंड येण्याचा त्रास हा खूप विचित्र पद्धतीचा असतो. यामुळे जेवण तर करता येत नाही परंतु अगदी पाणी प्यायला सुद्धा खूप त्रास होतो. जास्त करून शरीरातील उष्णता वाढल्यामुळे, किंवा काही जणांना मसालेदार पदार्थ खाणे मानवत नाही, यामुळे देखील तोंड येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शरीरामध्ये विटामिन बी ची कमतरता झाली तर तोंड येण्याच्या प्रमाणात वाढ होते.
आहारामध्ये पालेभाज्या यांचा समावेश न करणे किंवा खूप कमी प्रमाणात करणे अशा व्यक्तींना देखील तोंड येण्याचा त्रास संभवतो. सोबतच धूम्रपान, सतत चहा किंवा कॉफी घेणे किंवा दारू पिण्याचे व्यसन इत्यादी कारणांमुळे देखील तोंड येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे काही छोटे परंतु महत्त्वाचे घरगुती उपाय आपण पाहू ज्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.
तोंड येण्याच्या समस्यावर घरगुती उपाय
1- यासाठी कोथिंबिरी सगळ्याच्या घरात असते. या कोथिंबिरीचा रस काढावा व एखादा चमचा रस तोंडात घ्यावा आणि एखादा मिनिटभर तोंडात ठेवावा. जर दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केला तर दोन दिवसात आराम मिळतो.
नक्की वाचा:Health Tips: कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते? जाणून घ्या अहवाल
2- तसेच पेरूच्या झाडाची पाने पाण्यात उकळून घ्यावेत व कोमट झाल्यावर या पाण्याने गुळण्या कराव्यात. परंतु पेरूची पाने घेताना एकदम करपलेली किंवा अतिशय कोवळी अशी पाने न घेता मध्यम स्वरूपाचे पानाची निवड करावी.
3- दुसरा उपाय म्हणजे एक ग्लास कोमट पाणी घ्यावे व त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालावे. या पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळेस गुळण्या केल्या तर आराम मिळू शकतो.
4- तसेच दिवसातून तुळशीची पाच पाने चार ते पाच वेळेस व्यवस्थित चावून खावीत.
5- खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्याने देखील तोंडातील फोड किंवा जखमा कमी होण्यास मदत होते.
( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत किंवा कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठलाही उपचार करण्या अगोदर किंवा आहारात बदल करणेअगोदर डॉक्टरांचा सल्ला द्यावा.)
नक्की वाचा:सावधान! जेवल्यानंतर ताबडतोब झोपत असाल तर होऊ शकतात गंभीर आजार; वाचा सविस्तर
Published on: 24 October 2022, 08:19 IST