Health

गुडघेदुखीचा त्रास हा आपल्यापैकी बहुतेक जणांना त्रस्त करत असतो. यामध्ये शेतकरी बांधवांचा विचार केला कष्टाचे काम असल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. एवढेच काय तरुण वर्गात देखील आजकाल गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपाय देखील तुम्हाला करता येणे शक्य आहे. या लेखामध्ये आपण गुडघेदुखीवर रामबाण ठरतील असे उपाय पाहू.

Updated on 23 October, 2022 7:23 PM IST

गुडघेदुखीचा त्रास हा आपल्यापैकी बहुतेक जणांना त्रस्त करत असतो. यामध्ये शेतकरी बांधवांचा विचार केला कष्टाचे काम असल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. एवढेच काय तरुण वर्गात देखील आजकाल गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपाय देखील तुम्हाला करता येणे शक्य आहे. या लेखामध्ये आपण गुडघेदुखीवर रामबाण ठरतील असे उपाय पाहू.

नक्की वाचा:वजन आणि पोटाची चरबी कमी करा 'या' महत्वाच्या टिप्सने; जाणून घ्या सविस्तर

 गुडघे दुखी वर घरगुती उपाय

1- हळदीचे दुधाचे सेवन- हळदीच्या दुधाचे नियमितपणे सेवन केले तर अनेक आजारांना दूर ठेवण्यास  मदत मिळेल. हळदीचे दूध पिल्यामुळे गुडघेदुखीच्या असह्य वेदनांपासून आराम मिळू शकतो. तसे शरीर मजबूत ठेवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

2- कोरफड जेल उपयुक्त- तसे पाहायला गेले तर कोरफड जेलचा वापर हा त्वचा निरोगी आणि नितळ ठेवण्यासाठी केला जातो. परंतु या जेल मधील पोषक तत्वे हाडे आणि स्त्रियांसाठी देखील लाभकारक आहेत. जर गुडघेदुखीचा त्रास उद्भवला तर गुडघ्यांना कोरफड जेल लावुन हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे  या कोरफड जेलमधील पोषणतत्वे त्वचेच्या छिद्रामधून शरीराच्या पेशीपर्यंत पोहचतात व आपल्याला आराम देण्याचे काम करतात.

3- थंड पाण्याने गुडघे शेकणे- हा एक जुना उपाय असून यामुळे रक्तवाहिन्यांना जे काही सुज आलेली असते ते कमी होते व त्या भागातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. या उपचारामुळे देखील गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.यासाठी तुम्ही बर्फाचा देखील वापर करू शकता त्यासाठी एका कापडामध्ये बर्फाचे काही तुकडे गुंडाळून घ्यावे आणि ज्या ठिकाणी वेदना होत आहेत त्याठिकाणी बर्फानी शेक द्यावा.

नक्की वाचा:गुडघेदुखीने उठणं बसणंही होईल कायमचं बंद, चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

4- आल्याचा काढा- आल्याचा काढा गुडघेदुखीवर रामबाण उपाय असून ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आल्याचा काढा नियमितपणे घ्यावा. असे पेशीना काही दुखापत झाली असेल तर त्यावर देखील हा उपाय चांगला ठरतो.

5- ढोबळी मिरची- लाल किंवा काळ्या रंगाचे ढोबळी मिरची गुडघेदुखीवर रामबाण औषध आहे. याचे सेवन केल्याने गुडघे दुखणे कमी होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

6- सफरचंदाचा रस- जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही नियमितपणे एक चमचा सफरचंदाचा रस पाण्यात घालून नियमितपणे पिले तर गुडघ्याचे दुखणे दूर पळते.

( टीप- वरील माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेतले असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. कुठलाही उपचार करण्याअगोदर किंवा आहारात बदल करणे अगोदर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

नक्की वाचा:Health Tips: कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते? जाणून घ्या अहवाल

English Summary: this is home remedy is so useful and give comfort in knee pain
Published on: 23 October 2022, 07:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)