बऱ्याचदा आपले आवडते जेवण असते आणि अशावेळी आपण कुठल्याही प्रकारचा विचार न करता खूप जास्त खाऊन घेतो. त्यानंतर बर्याच जणांना पोटात गॅस होण्याची आणि पोटात दुखण्याची समस्या उद्भवते. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच जागी बसून जर काम असेल तर पोटात गॅस होण्याची समस्या उद्भवू शकते तसेच अति चहा प्यायल्याने देखील पोटात गॅस होतो.
यामुळे पोट फुगणे, पोटात दुखणे या तक्रारी वाढतात. त्यामुळे या लेखात आपण दोन घरगुती उपाय जाणून घेणार आहोत,त्यामुळे पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी दूर होते.
नक्की वाचा:काहीही करा पण हे पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नका, कारण काय होईल तुम्हीच वाचा
पोटातील गॅस वर घरगुती उपाय
1- आले- जर तुमच्या पोटात गॅस झाला असेल तर तुम्ही आले खाऊ शकता किंवा पोटातील गॅस निघून जाण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा पिणे लाभकारक आहे परंतु चहा बिनदुधाचा असावा.
त्यात दुसरा पर्याय म्हणजे एक कप पाण्यामध्ये आल्याचे काही तुकडे जाडेभरडे बारीक करून जर पाण्यात व्यवस्थित उकळले आणि हे पाणी अगदी थोडे कोमट करून पिले तर पोटातील गॅस पासून आराम मिळतो.
नक्की वाचा:सांधेदूखी, मणक्यांचे आजार, दुखावलेले स्नायू काळजी व उपचार
2- जिऱ्याचे पाणी- पोटामध्ये गॅसची समस्या झाली असेल तर अशावेळी तुम्ही त्यावर जिरे पाणी हा एक उपाय करू शकतात. कारण जिऱ्यामध्ये असलेले तेल लाळग्रंथीना उत्तेजित करते.
जिरे खाल्ल्याने अन्नाचे पचन देखील चांगले होते त्यामुळे पोटात गॅस होत नाही. तुम्हाला जर जिरे पाणी तयार करायचे असेल तर त्यासाठी एक चमचे जिरे घ्यावे आणि दोन कप पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे उकळून ते पाणी थंड झाल्यावर प्यावे. गॅस पासून त्वरित मुक्तता मिळते.
नक्की वाचा:काळी मिरी खाण्याचे उत्तम मार्ग, आरोग्य फायदे यावर आयुर्वेद तज्ञ
Published on: 28 August 2022, 07:52 IST