Health

तासनतास कम्प्युटरसमोर बसून किंवा तुम्ही जेव्हा तणावाखाली वावरत असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला डोळ्याचा चूरचूरणं जास्तीत जास्त जाणवत असेल…

Updated on 24 March, 2022 7:08 PM IST

तासनतास कम्प्युटरसमोर बसून किंवा तुम्ही जेव्हा तणावाखाली वावरत असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला डोळ्याचा चूरचूरणं जास्तीत जास्त जाणवत असेल…

पुरेशी झोप झालेली नसेल तर अशावेळेस डोळ्याखाली काळी वर्तुळ ही दिसून येतील… आणि मग बाहेर पडता नाही आपले डोळे पाहून तुम्हाला उत्साह जाणवणारा नाही. हि काळी वर्तुळे घालवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण जमत नसेल… तुझे साधे साधे उपाय तुम्हाला हव्या त्यावेळी करून पहा.

  • सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

1) मसाज :- तुमच्या डोळ्यांभोवती दिवसातून 2-3 वेळेस किमान 20 सेकंड हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्यासोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यासाठी मदत होते.

नक्की वाचा:कंबरदुखी' ने बेजार झालात, हे 6 उपाय करा आणि 'वेदनामुक्त' व्हा, जाणून घ्या

2) हाताच्या तळव्व्यांचा स्पर्श:- योग विद्देमध्ये या साधनेला विशेष महत्त्व आहे. हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा 2-3 मिनिटानंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यासाठी मदत होते.

3) थंड दूध :- डोळ्यांवरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत.4-5 मिनिटांनी तुम्हाला रिलॅक्स वाटेल. तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळे होण्यास मदत होते. तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

4) काकडी :- काकडी मध्ये कूलिंग इफेक्ट असल्याने अनेकदा सलूनमध्ये फेसपॅक लावल्यानंतर डोळ्यावर काकडी ठेवली जाते. काकडी मध्ये ॲस्ट्रीजंट घटक डोळ्यांवरील ताण हलका करतात काकडीचे काप3-4 मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळ आराम करा.

नक्की वाचा:मोर्फा ठरत आहे सेंद्रिय शेती साठी एक आशेचा किरण! सेंद्रिय शेतमाल उत्पादन आणि मार्केटिंगसाठी करते प्रयत्न

5) गुलाब पाणी:- नैसर्गिकरित्या थंड प्रवृत्तीचे गुलाब पाणी डोळ्यांमधील जळजळ  कमी करण्यास मदत करते.त्यातील ॲस्ट्रीजंट आणि दाहशामक घटक डोळ्यांवरील ताण हलका करण्यास मदत करतात. गुलाब पाण्यात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. 4-5 मिनिटांनी काढून चेहरा हलकासा पुसा.

English Summary: this is easy and benificial remedy for eye stress and burning in eye
Published on: 24 March 2022, 07:08 IST