आपल्यापैकी बऱ्याच जणांना अचानक उचकी लागते. त्यानंतर उचकी कशी थांबवायची हे आपल्याला कळतच नाही. बरेच जण उचकी लागल्यानंतर पाणी पितात. परंतु यामुळे देखील उचकी थांबेल याची काही शाश्वती नसते. तसं पाहायला गेले तर ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु सतत उचकी येत राहणे हा एक गंभीर आजार असू शकतो.
उचकी लागल्यानंतर कुठल्याही कामांमध्ये मन लागत नाही तसेच अस्वस्थ वाटायला लागते. या अशा सामान्य पर्यंत त्रासदायक समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण या लेखात काही साधे आणि सोपे उपाय पाहू.
नक्की वाचा:ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक; वेळीच अशापद्धतीने घ्या काळजी
उचकी लागली असेल तर थांबवण्यासाठी करा हे उपाय
1- साखर खाणे उत्तम ठरेल- तुम्हाला उचकी लागल्यावर एक चमचा साखर खावी. यामुळे काही वेळामध्ये उचकी थांबण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही साखर आणि थोडे मीठ पाण्यामध्ये टाकून ते थोड्या थोड्या वेळाने पिले तरी उचकी थोड्या वेळात थांबण्यास मदत होते.
2- मिठाचे पाणी आहे उत्तम उपाय- उचकी लागल्यानंतर तुम्ही एक चमचा मीठ जर तोंडात ठेवले तर यामुळे देखील उचकी थांबते. परंतु हे जर तुम्हाला शक्य वाटत नसेल तर तुम्ही मिठाचे पाणी एक एक घोट प्यायले तरी उचकी ताबडतोब थांबते.
3- लिंबू आणि मध- उचकी लागल्यानंतर जर तुम्ही एक चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करून त्याचे चाटण तयार केले व ते जर घेतले तर काही वेळात उचकी बंद होते.
4- काळे मिऱ्याचा उपयोग- उचकी लागल्यानंतर जर तुम्ही तीन ते चार काळीमिरी आणि खडीसाखर तोंडात ठेवून चावले आणि त्यानंतर एक ते दोन घोट पाणी पिले तरी उचकी थांबते.
5- टोमॅटो एक सर्वोत्तम उपाय- तुम्ही टोमॅटो जरी खाल्ले तरी उचकी थांबण्यास मदत होते. परंतु टोमॅटो खाताना ते दातांनी न चावता सावकाश खावे. त्यामुळे आपली श्वास
घेण्याच्या गतीत बदल होतो आणि उचकी बंद होण्यास मदत होते.
6- उलटे अंक मोजणे- शंभर ते एक असे उलटे अंक मोजल्याने देखील उचकी थांबण्यास मदत होते.
नक्की वाचा:थंडीत रिकाम्यापोटी 'या' 6 गोष्टींचा आहारात समावेश करा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
Published on: 28 October 2022, 07:26 IST