Health

सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. या दिवसात सतत वातावरण बदलत असते.अधेमध्ये ढगाळ वातावरण पावसाळी वातावरण तर कधी थंडीवाढणे यामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला येणंही सामान्य गोष्ट आहे

Updated on 06 February, 2022 7:02 PM IST

सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. या दिवसात सतत वातावरण बदलत असते.अधेमध्ये ढगाळ वातावरण पावसाळी वातावरण तर कधी थंडीवाढणे यामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला येणंही सामान्य गोष्ट आहे

परंतु याची योग्य वेळेत योग्य काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी घरगुती उपाय कायम फायदेशीर ठरत असतात.

 सर्दी खोकल्यावर ती आयुर्वेदिक उपचार

  1. या काळात गरम पाणी प्यावे. खोकला घालवण्यासाठी आले, दालचिनी आणि काळे मिरे यांना.उकळून प्यावे.
  2. हळदीचे दूध सुद्धा यावर अधिक  किफायतशीर ठरते.
  3. एक चमचा कांद्याच्या रसात मध मिसळून रोज सकाळी उपाशी पोटी घेतल्याने आराम मिळतो.
  4. मोहरीच्या तेलामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून पायाच्या तळव्यांवर आणि छातीवर लावून मालिश करावी.
  1. एक कप पाण्यात अर्धा चमचा ज्येष्ठमधाची पावडर आणि8-10तुळशीचे पाने टाकून उकळून घ्या.
  2. जवस आणि तिळाचे पूड कोमट पाण्यात टाकून पिल्यानेलगेच आराम मिळतो.

 हॉस्पिटल मधे जाण्या आधी एकदा हे उपाय कराच

 सध्याचे वातावरण खराब असून कोविडचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. आणि फ्ल्यू चे इन्फेक्शन सुद्धा होत आहे.

अशा वेळी घराबाहेर पडून आजाराला मिठीत घेण्यापेक्षा किमान एकदा तरी आयुर्वेदिक उपाय घरच्या घरी आजमाऊन पहावेत.

( टीप- कुठलाही औषधोपचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

English Summary: this is benificial ayurvedic remedy for cold and cough
Published on: 06 February 2022, 07:02 IST