आपण आपल्या आहारामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या तसेच डाळी खातो. जे की यामधून आपणास अनेक प्रकारचे व्हिटॅमिन तसेच प्रोटीन भेटतात. आपणास प्रोटीन ची आवश्यकता असेल तर आपणास मांसाहार मधून सुद्धा मिळवतो. मग ते अंडी, चिकन किंवा मासे असो. मात्र सर्वच लोक मांसाहार खात असतात असे नाही काही लोक शाकाहार खाणे सुद्धा पसंद करतात. मग शाकाहारी मधून जर आपणास प्रोटीन मिळवायचे असेल तर आपणास विविध प्रकारच्या डाळी खाल्या पाहिजेत. पण कोणत्या डाळींमधून किती प्रोटीन भेटते तसेच अजून कोणते पर्याय आहेत त्यामधून आपणास प्रोटीन भेटते ते आज आपण पाहणार आहोत. कारण आपल्या शरीरातील जडणघडण योग्य प्रकारे तसेच जे स्नायू असतात त्यांना बळकटी येण्यासाठी प्रोटीन खूप गरजेचे आहे.
१. मुग डाळ :-
आपल्या आहारात आपण मुगाच्या डाळीपासून विविध प्रकारच्या भाज्या तयार करतो. जे की काही लोकांना मुग डाळ आवडत नसेल पण तुम्हाला प्रोटीन व्ही आवश्यकता असेल तर आहारात मुग डाळीचा नक्की समावेश करा. विविध भाज्यांमध्ये तसेच खिचडीमध्ये सुद्धा जी डाळ वापरली जाते ती मुगडाळ असते. तर एक मध्यम आकाराची वाटी असते त्या वाटीभर मुग डाळीतून आपणास ९ ग्रॅम इतके प्रोटीन भेटते. जे प्रोटीन आपल्या शरीरातील कमतरता भरून काढते आणि आपले स्नायू वगैरे दुखत असतील तर ती समस्या सुद्धा बंद होते. मात्र आहारात तुम्ही मुग डाळ ठेवणे गरजेचे आहे.
२. चना डाळ (हरभरा डाळ ) :-
हरभरा ची डाळ सुद्धा आपण विविध भाज्यांमध्ये वापरतो. तसेच हरभरा च्या डाळीपासून आपणास विविध पदार्थ सुद्धा तयार करतो. आपल्या आहारात चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ असणे गरजेचे आहे कारण यामधून सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे प्रोटीन भेटते. एक मध्यम प्रकारच्या हरभरा डाळीच्या वाटीमधून आपल्या शरीराला ७ ग्रॅम पर्यंत प्रोटीन भेटते जे प्रोटीन आपल्या शरीरातील समस्या दूर करते. किमान आठवड्यातून दोन वेळा तरी चना डाळ आपल्या आहारात असावी.
३. तूर डाळ :-
रोज संध्याकाळी जेवण करण्यावेळी भातासोबत वरण केले असते जे की त्या वरणामध्ये अनेक ठिकाणी तूर डाळीचा समावेश असतो. तूर डाळीमुळे वरणाला चव येते तसेच तूर डाळीमधून आपणाला प्रोटीन सुद्धा भेटते. एक मध्यम प्रकारच्या वाटीभर तूर डाळीतून आपल्याला ११.९ ग्रॅम प्रोटीन भेटते जे की आपल्या शरीराला फायदेशीर आहे.
४. मसूर डाळ :-
मुग डाळ असो तसेच तूर डाळ, चना डाळ या डाळीचा आहारात सारखा समावेश होतो मात्र मसूर डाळीचा पाहिजे असा जास्त उपयोग केला जात नाही. मात्र प्रोटीन जर घ्यायचा म्हणले तर मसुरी ची डाळ आपल्या शरीसाठी खूप च पौष्टिक आहे. एक वाटी मसूर डाळ आपणाला ९ ग्रॅम एवढे प्रोटीन देते.
५. उडीद डाळ :-
इडली, डोसा किंवा उडीद वडे म्हणजेच मेदू वडा यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी उडीद डाळीचा समावेश असतो. उडीद डाळ आपल्या शरीरासाठी पौष्टिक असून आपल्या आहारात उडीद डाळीचा समावेश वाढवला पाहिजे. कारण एक वाटी उडीद डाळ आपल्याला ८ ग्रॅम एवढे प्रोटीन देते जे आपल्या स्नायूंना फायदेशीर आहे.
Published on: 04 March 2022, 02:17 IST