आरोग्यासाठी ‘या’ तेलांचा होतो फायदा; जाणनू घ्या! तेलांचे गुण

20 July 2020 11:21 PM


आपल्या आहारात आपण तेलाचा उपयोग करत असतो. प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार तेलाचा वापर आपल्या स्वंयपाकात करत असतात. परंतु या तेलांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याची आपल्याला पुरेशी माहिती नसते. आरोग्यासाठी कोणते तेल फायद्याचे आहे किंवा कोणत्या तेलाचा आपल्या आहारात समावेश केल्यास फायदेकारक राहिल याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

      तेलामध्ये असलेल्या स्निग्ध पदार्थांच्या प्रमाणावरून तेलाचे चार प्रकार पडतात.

  • सॅच्युरेटेड
  • अन सॅच्युरेटेड
  •  मोनो सॅच्युरेटेड
  • पॉली सॅच्युरेटेड

 या सगळ्या प्रकारांपैकी अन सॅच्युरेटेड तेल फायदेशीर असते.  त्यापैकी मोनो सॅच्युरेटेड व पोली सॅच्युरेटेड हे फॅट हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.  शेंगदाण्याचे तेल आणि मोहरी तेल हे मोनो सॅच्युरेटेड तेल आहेत. तसेच पोली सॅच्युरेटेड मध्ये ओमेगा 3 व सहा फॅट असतात. पॉली सॅच्युरेटेड फॅट असलेली सगळी तेले उत्तम असतात. अक्रोड तेल,  माशांचे तेलामध्ये पॉली सॅच्युरेटेड फॅट जास्त असतात.

तेलाचे आरोग्यदायी फायदे -  

शेंगदाणा तेल- शेंगदाणा तेलामध्ये सगळ्याच प्रकारचे फॅट असतात ते हृदयविकारापासून बचाव करतात. शेंगदाणा तेलामध्ये नैसर्गिक एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे तयार होणारे फ्री रॅडिकल्स रोखतात आणि आपला कर्करोगापासून बचाव होतो. शेंगदाणा तेल आपल्या शरीरामध्ये वाहणाऱ्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो.

 तीळ तेल-  तिळाचे तेल दोन प्रकारचे असते एक म्हणजे रिफाइंड आणि दुसरे म्हणजे नॉन रिफाइंड रिफाइंड न केलेले तिळाचे तेल अण्णाला छानसा सुगंध देते.  तिळाच्या तेलात विरघळणारे एंटीऑक्सीडेंट असतात जे थ्री रेडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचाही गुणधर्म आहे.  तीळ तेल आपल्या नसा आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. तिळाचे तेल रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारशक्ती वाढविते.  तसेच पोटाच्या समस्यांवरही तिळाचे तेल हे रामबाण उपाय आहे,  जे लोक तिळाचे तेल नेहमी वापरतात ते ताणतणावावर सुद्धा मात करू शकतात. तिळाच्या तेलात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते सांधेदुखी आणि वात यासाठी उपयोगी आहे.

सनफ्लावर तेल-

या तेलामध्ये इ जीवनसत्व जास्त प्रमाणात असते तसेच सनफ्लावर तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असतात. सनफ्लावर तेलामध्ये  पोली सॅच्युरेटेड फॅट आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असतात, त्यामुळे ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात म्हणून सनफ्लावर तेल हृदयासाठी उपयुक्त आहे.

करडई तेल -

करडई तेलामुळे वजन कमी करण्यास मदत होते. करडई तेल पेशींचे आवरण मजबूत करण्यासाठी मदत करते,  त्यामुळे पेशींमध्ये विषारी घटकांना आत जाण्यास मज्जाव करण्यात येतो. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते करडई तेल हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते,  त्यामुळे हे तेल मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. महत्त्वाचे म्हणजे  शक्य असेल तर सेंद्रिय रिफाईन न केलेले वनस्पती तेल वापरावे. कच्चे तेल वापरायचे असेल तर शुद्ध ऑलिव्ह तेल वापरा पण त्याचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी करू नका.

  • एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, थंड प्रक्रिया केलेले आणि सेंद्रिय तेल रिफाइंड तेलापेक्षा चांगले असतात. तेलांना रिफाइन केल्यामुळे त्याचे आरोग्यदायी गुण कमी होतात.
  • तेलांचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे पण आहेत. म्हणून असे तेल वापरा घेते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.  ट्रान्सलेट असलेले तेल टाळा.  वनस्पती तेलात ट्रान्स फॅट जास्त असतात, त्यामुळे ते शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात.  हृदयविकार होण्याची संभावना असते.  यामुळे तेल असे वापरा की त्याचा स्मोक पॉईंट जास्त आहे. त्यात अँटिऑक्सिडंट व विटामिन जास्त प्रमाणात असतील तर फारच चांगले.

तेलाचे फायदे शेंगदाणा तेल रिफाइन तेल सोयाबीन तेल cooking oil groundnuts oil refine oil soyabean oil
English Summary: These oil are good for health , read this to know the qualities

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.