Health

व्हिटॅमिन D ची कमतरता असेल तर तुम्हाला काही पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन तुम्ही करायला हवे. ते देखील तुम्हाला माहीत हवे. त्यामुळे आम्ही व्हिटॅमिन D असलेल्या पदार्थांची एक यादीच तयार केली आहे.

Updated on 19 May, 2022 3:45 PM IST
1. कॉड लीव्हर तेल (COD Liver Oil)
बाजारात कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या मिळतात. जर तुम्ही अंडी किंवा मासे खात नसाल तर अनेकदा त्यांच्यातील पोषकतत्वे तुम्हाला मिळावे म्हणून कॉड लीव्हर ऑईल असलेल्या गोळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो. कॉड लीव्हर ऑईल घेण्याचे काही दुष्परिणाम नाहीत. पण जर तुम्हाला काही त्रास असतील तर मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचे सेवन करायला हवे.2.सोयाबीनचे दूध (Soy Milk)
डाएट करणाऱ्यांना सोयाबीनचे दूध माहीतच असेल. व्हिटॅमिन D आणि मिनरल्सनी युक्त असलेले सोयाबीनचे दूध तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते. जर तुम्हाला गायीचे दूध आवडत नसेल तर तुम्ही सोयाबीनचे दूध पिऊ शकता. सोयाबीनचे दूध हल्ली सर्वत्र उपलब्ध आहे3.गायीचे दूध (Cow Milk )गायीच्या दुधामध्ये व्हिटॅमिन D भरपूर असते. जर तुम्ही दिवसातून दोनदा दूध पित असाल तर तुम्हाला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन D मिळेल. लहान मुलांनाही त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दिवसातून किमान एकदा तरी ग्लासभरुन दूध प्यायला काहीच हरकत नाही. अनेकांना दूध आवडत नाही. पण व्हिटॅमिन D मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुधामध्ये कोणतीही पावडर घालून दुधाचे सेवन करु शकता. 
4.शिंपल्या (Oysters)माशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन D असते. जर तुम्ही मासे खात असाल तर तुम्ही शिंपल्या ट्राय करायला हव्यात. शिंपल्या ट्राय करणे अनेकांना कष्टाचे वाटते म्हणून ते करायला पाहत नाहीत. पण जर तुम्हाला शिंपल्या करता येत नसतील तर तुम्ही त्या सरळ उकडून त्यातील मांस काढून घेऊ शकता. त्यांनतर तुम्ही तुमच्या पद्धतीची ग्रेव्ही किंवा सुक्या मसाल्यामध्ये शिंपल्या करु शकता.5.कोळंबी (Shrimp)कोळंबी हा माशाचा प्रकारही अनेकांना आवडतो. जर तुम्ही कोळंबी खात असाल तर फारच उत्तम. कोळंबी साफ करण्याचे कष्ट अनेकांना आवडत नाही. शिवाय ती उष्ण असतात म्हणूनही अनेक जण खाणं टाळतात. पण तुम्ही योग्य प्रमाणात कोळंबी खाल्ली तर तिचा तुम्हाला त्रास होणार नाही. उलट तुम्हाला कोळंबीपासून भरपूर फायदे मिळतील. 6.अंडी (Egg)अनेक जणांना नाशत्यामध्ये अंडी खाण्यास पसंती देतात. अंडी शरीरासाठी चांगली असतात हे सांगणाऱ्या अनेक जाहिराती तुम्ही या आधीही पाहिल्या असतीलच. त्यामुळे तुम्हाला अंड्यांमध्ये असणाऱ्या पोषकतत्वाबद्दल काही विशेष सांगायला नको. पण आहारात तुम्हाला अंडीचा समावेश करणे फारच फायद्याचे आहे. त्यामुळे तुम्ही दिवसात किमान दोन तरी अंडी खाच.
7.मशरुम्स (Mushrooms)आता जर तुम्ही शाकाहारी असाल तरी तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण मशरुम्समध्येही व्हिटॅमिन D मुबलक प्रमाणात असते. हल्ली डाएटमुळे अनेकांना मशरुम्स खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हल्ली मशरुम्स सगळीकडेच मिळतात. मशरुम्स तुम्ही भाजी किंवा भातात घालू शकता आणि त्याचे सेवन करु शकता. 8.ओट्स (Oats)सकाळच्या नाशत्यामध्ये ओट्स खाण्याचा सल्लादेखील दिला जातो. त्यामध्येही व्हिटॅमिन D असते. तुम्हाला ओट्सची चव आवडत नसेल तर हल्ली बाजारात मसाला ओट्ससुद्धा मिळतात. तुम्ही ते खाऊ शकता. ओट्स हे नेहमी गरम खायला हवेत. जर तुम्हाला ओट्सचा उपयोग करुन अन्य काही रेसिपी तयार करता येत असतील तर फारच उत्तम 9.संत्र्याचा रस (Orange Juice)
फळांच्या रसामध्ये ही व्हिटॅमिन D असते. आता संत्र म्हटल्यावर आपल्याला त्यात व्हिटॅमिन C असल्याचेच माहीत आहे.पण संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन D सुद्धा आहे. तुम्हाला सुंदर त्वचेसोबत इतरही फायदे संत्र्याच्या रसामुळे मिळतील.10.टुना मासा (Tuna Fish)टुना मासामध्ये व्हिटॅमिन D भरभरुन असते. त्यामुळे तुम्हाला आहारात टुना मासा खाता आला तरी चालेल. खूप जण टुना मासा खात नाहीत. पण जर तुम्ही नव्याने खाणारे असाल तर तुम्ही टुना मासा खाऊ शकता. टुना मासा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण तुम्ही एकदा तरी हा मासा ट्राय करायला काहीच हरकत नाही. 
हे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडतील तुमच्या त्वचेसाठी व्हिटॅमिन D चांगले आहे का?मासे, अंडी, फळं यांमाध्ये व्हिटॅमिन D असल्यामुळे तुमच्या त्वचेवरही याचा परिणाम होतो. तुमच्या त्वचेवरील चमक कायम ठेवण्यास हे पदार्थ मदत करतात. त्यामुळे तुमच्या आहारात व्हिटॅमिन D असेल तर तुम्हाला त्याचा हमखास फायदा होईल. म्हणून चांगल्या त्वचेसाठी आहारात व्हिटॅमिन D चा समावेश असू द्या.*तुमच्या मूडवर व्हिटॅमिन D परिणाम करते का?तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D चे प्रमाण कमी झाले तर तुम्हाला अनेक त्रास होऊ लागतात. सतत आजारपण येणे, थकवा येणे असे तुम्हाला वाटू लागते. याचा परिणाम तुमच्या मूडवर होतो. चीडचीडेपणा वाढतो. काम करण्याची फारशी इच्छा होत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन D चा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि मूडवर होतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन D चा समावेश असू द्या.प्रत्येक दिवशी किती व्हिटॅमिन D शरीरासाठी आवश्यक असते?आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट असलेल्या अन्नपदार्थांमध्ये व्हिटॅमिन D असतेच. तुमच्या शरीरासाठी व्हिटॅमिन D फारच आवश्यक असते. तुमच्या आहारात किमान 10 ते 20 मायक्रोग्रॅम तरी व्हिटॅमिन D हवे. जास्तीत जास्त आणि योग्य प्रमाण 25 ते 100 मायक्रोग्रॅम इतके असते. त्यामुळे तुम्ही दिवसाला किमान इतके तरी व्हिटॅमिन D घ्यायला हवे.
English Summary: These foods provide Vitamin-D and make you strong
Published on: 19 May 2022, 03:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)