Health

बऱ्याच वेळा रात्री झोपल्यानंतर पुरुषांना अचानक घाम येतो. येणाऱ्या घामामुळे प्रचंड त्रास सुद्धा होतो शिवाय झोप सुद्धा नीट लागत नाही. याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो यामुळे आपल्याला प्रचंड थकवा आणि अस्वस्थ वाटू लागते. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की नेमकं हा घाम येतो तरी का काय आहेत या मागील कारण.

Updated on 30 August, 2022 5:56 PM IST

बऱ्याच वेळा रात्री झोपल्यानंतर पुरुषांना अचानक घाम येतो. येणाऱ्या घामामुळे प्रचंड त्रास सुद्धा होतो शिवाय झोप सुद्धा नीट लागत नाही. याचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो यामुळे आपल्याला प्रचंड थकवा आणि अस्वस्थ वाटू लागते. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की नेमकं हा घाम येतो तरी का काय आहेत या मागील कारण.

घाम येण्याची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात परंतु यावर दुर्लक्ष करणे तुमच्या जीवावर बेतू शकते घाम आल्यास लवकरात लवकर डॉक्टर कडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे हे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे.

चिंता आणि तणाव:-

जर तुमच्या आयुष्यात सतत चिंता आणि तणाव असेल तर हे तुमच्या साठी खूप धोकादायक आहे. एकाच गोष्टीवर सतत विचार करणे किंवा कामाचा तणाव घेणे यामुळे रात्री झोपल्यावर तुम्हाला घाम येऊ शकतो.म्हणून तुम्ही जास्त चिंता करणं, विचार करणे आणि तणाव घेणे कमी केल पाहिजे.

गॅस्ट्रोओसोफेगल रिफ्लक्स:-

रात्री झोपताना घाम येण्याचं अजून एक कारण म्हणजे जीइआरडी. यादरम्यान तुमच्या पोटात अॅसिड एसोफॅगस वाढू लागते आणि पोटात जळजळ होऊ लागते . यामुळे आपल्या हृदयाची धडधड अधिक वाढते वाढू यामुळे छातीत जळजळ करणे श्वास घेण्यास त्रास होणे या मुळे सुद्धा रात्री झोपेत घाम येऊ शकतो.

व्यसन:-
ज्या व्यक्ती विविध मादक पदार्थांचे सेवन करतात म्हणजेच तंबाखू खाणे, गुटखा खाणे, दारू पिणे आणि धूम्रपान करणे यामुळे सुद्धा काही वेळा रात्री झोपेत घाम येतो. त्यामुळे निरोगी शरीरासाठी व्यसनापासून दूर राहावे

टेस्टोस्टेरॉन कमी झाल्याने:-
आपल्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी झाल्यामुळे रात्री झोपेत आपल्याला घाम येऊ शकतो जसजसे आपण मोठे होत जातो शरीर कमी टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करतं. ज्यामुळे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे कधी कधी समस्या निर्माण होतात. अशावेळी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे महत्वाचं आहे.

English Summary: These can be the reasons for excessive sweating during sleep, know
Published on: 30 August 2022, 05:56 IST