निलगिरीचा अनेक पद्धतीने उपयोग होतो. अशा या निलगिरीला उबदार प्रदेशातील वनस्पती म्हणूनही ओळखले जाते.या वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणूनही केला जातो. यामाध्यमातून तेल, औदयोगिक तेल, औषधी तेल बनवण्यात येते.
अशाच या निलगिरी पासून बनलेल्या तेलाचा वापर कोणत्या आजारावर करू शकतो ते जाणून घेऊया.जर तुम्ही संधिवाताने त्रस्त असाल तर त्यावर निलगिरीचे तेल उत्तम औषध म्हणून काम करते. संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल
समप्रमाणात घेऊन चोळल्याने संधिवात कमी होतो.तसेच भाजलेल्या जागेवर निलगिरीच्या तेलाने मसाज केल्यास जखम लवकर भरून येते.श्वसननलिकेचा दाह आणि तुम्ही कित्येक दिवसांपासून दम्याचा त्रास सहन करत असाल तर
यावर निलगिरीचे तेल उत्तम उपाय आहे.निलगिरीच्या मुळामध्ये रेचक आणि निलगिरीच्या खोडाच्या सालींमध्ये टॅनिन असते यामुळे हे निलगिरी तेल नाकाच्या तक्रारीमध्ये उपयोगी असते.जुन्यात जुने कातडीचे रोगांवरही निलगिरीचे तेल उपयुक्त सिद्ध होते.
Published on: 17 May 2022, 11:15 IST