Health

गूळ खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर उपयुक्त तसेच आरोग्यदायी मानले जाते. तसेच हिवाळ्यात गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरास मोठ्या प्रमाणात फायदे होतात.गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ते म्हणजे आपली पचनक्रिया योग्य राहते याच बरोबर आपल्या शरीरातील हाडे सुद्धा मजबूत आणि बळकट होत असतात.

Updated on 14 December, 2021 2:13 PM IST


गूळ खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर उपयुक्त तसेच आरोग्यदायी मानले जाते. तसेच हिवाळ्यात गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरास मोठ्या प्रमाणात फायदे होतात.गुळाचे अनेक(health) आरोग्यदायी फायदे आहेत ते म्हणजे आपली पचनक्रिया योग्य राहते याच बरोबर आपल्या शरीरातील हाडे सुद्धा मजबूत आणि बळकट होत असतात.

अनेक रोगांवर रामबाण उपाय :

मधुमेह असलेल्या रुग्णांनी साखरे ऐवजी गुळाचे सेवन केले तर शरीरातील आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.गुळामध्ये व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस यांसारखी अनेक शरीरास आवश्यक असणारी मिनरल्स आढळतात. म्हणून गुळाचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.


1) गूळ आणि तूप:- गुळासोबत एक चमचा तूप खाल्ले तर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून कायमस्वरूपी ची सुटका होते. तसेच दररोज आहारात गूळ आणि तुपाचे सेवन केले तर पचनासंबंधीत असलेले आजार नाहीसे होतात तसेच पचनक्रिया सुधारते.

2) गूळ आणि मेथीचे दाणे:- केस गळती कमी करायची असेल तर रोज गूळ आणि मेथी दाण्याचे सेवन करावे. मेथीचे आणि गुळाचे सेवन केल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

3) गूळ आणि डिंक:- डिंक आणि गुळाचे सेवन केल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. तसेच स्थानपान करणाऱ्या महिलांसाठी खूप फायदेशीर ठरते. तसेच केसांची वाढ लवकर होते.

4) गुळासोबत तीळ:- दररोज गुळासोबत तिळाचे सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि फ्लू या सारख्या व्हायरल संसर्गापासून बचाव होतो.

5)गुळ आणि शेंगदाणे- शेंगदाणे आणि गुळाचे लाडू खाल्ल्यामुळे स्नायू मजबूत होतात तसेच ताकत वाढते. तसेच ऐन वेळी भूक शांत ठेवण्यासाठी देखील ते खूप फायदेशीर आहे

6) गूळ आणि हळद- गुळासोबत हळद खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच थंडीच्या दिवसात शरीरास यापासून ऊब मिळते.

English Summary: These are the benefits of consuming jaggeryjaggery
Published on: 14 December 2021, 02:13 IST