उन्हाळा म्हणले की नागरिकांचा कल हा थंड गोष्टीकडे ओळतो. त्यामध्ये सर्वात जास्त नैसर्गिक फळ म्हणजे काकडी. काकडी मध्ये पौष्टिक तसेच अँटी-ऑक्सिडेंट असतात त्यामुळे आपले आरोग्य आणि सौंदर्य खुलून दिसते. काकडी ही चरबी कमी करण्यापासून ते अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी सरंक्षण करते. आपल्या शरीरात जर पाण्याची कमतरता असेल तर ती कमतरता भरून काढण्याचे काम काकडी करत असते. काकडी मध्ये १७ कॅलरी असतात. जे की त्यामध्ये ०.८ ग्रॅम प्रथिने, १३७ ग्रॅम पाणी, ०.३ ग्रॅम लोहा, पोटॅशियम १९३ मिलीग्राम, १९.९ ग्रॅम कॅल्शियम. व्हिटॅमिन सी ४.५ मिलीग्राम, कार्बोहायड्रेट ३.१ ग्रॅम, फायबर १ ग्रॅम, फोलेट 19.9 मायक्रोग्राम इत्यादी असते. रोज सकाळी तुम्ही १ काकडी खाणे गरजेचे आहे.
काकडी खाण्याचे फायदे:
१. कर्करोग प्रतिबंध :-
काकडी मध्ये जे प्रथिनांचे प्रमाण असते ते कर्करोग या आजाराशी लढण्यासाठी ताकद देत असतात. जर तुम्ही रोज सकाळी जर एक काकडी खाली तर कर्करोग किंवा ट्युमर चा विकास होणे थांबते आणि तुमचे या आजारांपासून सरंक्षण होते.
२. मधुमेह नियंत्रणात राहील :-
तुम्ही जर रोज १ काकडी तुमच्या आहारात ठेवली तर मधुमेह या आजारापासून तुमचे सरंक्षण होईल. तसेच ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी आपल्या आहारात काकडी खाणे गरजेचे आहे.
३. रक्तदाब नियंत्रण :-
काकडी मध्ये फायबर, पोटॅशियम तसेच मॅग्नेशियम चे प्रमाण असते जे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते. काकडी हे फळ एका औषधासारखे कार्य करत असते.
४. वजन कमी होते :-
काकडी मध्ये जास्त पाण्याचे प्रमाण असल्यामुळे चयापचायात मदत होते. काकडी खाल्याने आपल्या पोटावरची चरबी किंवा कंबर आणि मांडीवर असणारी चरबी कमी होण्यास मदत होते.
५. मजबूत प्रतिकारशक्ती :-
काकडी मध्ये पोषक तत्वे तर असतातच पण सोबतच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म सुदधा असतात. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत बनते तसेच रोगांपासून सरंक्षण सुदधा होई. आपली पचनशक्ती चांगली बनते.
मजबूत हाडे
६. दुर्गंधीपासून मुक्त व्हा :-
काकडीचा एक तुकडा जिभेच्या मदतीने वरच्या भागावर अगदी २० ते ३० सेकंद ठेवा जे की यामुळे आपल्या तोंडाची जी दुर्गंधी असते ती निघून जस्ट.
७. त्वचा चमकत जाईल :-
तुम्ही जर काकडीचा रस तुमच्या चेहऱ्यावर लावला किंवा काकडीच्या रसाची पेस्ट करून जर तुमच्या चेहऱ्यावर लावली तर सनटॅन, डाग, डाग, झाकरे, सुरकुत्या, मुरुम लगेच नाहीसे होतात. आपला चेहरा स्वच तसेच चमकाऊ आणि मऊ लागतो. तर आपल्या डोळ्यांवर जर काकडीचे काप ठेवले तर डोळ्यांची झळझळ कमी होते व डोळे थंड पडतात.
८. केसांची चमक वाढवा :-
तुमचे केस जर तुटत असतील किंवा कोंड्याची समस्या असेल तर काकडीचा रस तुमच्या केसांच्या मुळाला लावा. जर असे केले तर तुमचे केस देखील लांबतील शिवाय जाड, रेशमी, गुळगुळीत, चमकदार केस बनतील.
Published on: 13 April 2022, 06:18 IST