Health

कॅन्सर हा आजार खूपच भयंकर आहे जे की कॅन्सर वर उपचार आहेत मात्र काही वेळा त्यावर उपचार सुद्धा कामी पडत नाहीत. तज्ञ डॉक्टर वर्गाचे असे मत आहे की कॅन्सर ची लक्षणे ओळखू येताच त्यावर उपचार करणे यशस्वी ठरते. कोणताही आजार असो सर्वात महत्वाचे म्हणजे तो टाळण्यासाठी आपल्याला सकस आहार घेणे गरजेचे आहे. कोणताही आजार बरा होण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचा आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही कॅन्सरविरोधी जे आहार आहेत ते घेतले तर त्याचा धोका कमी होतो असे तज्ञ डॉक्टर सांगतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटी शिफारस यांचे असे मत आहे की आपले वजन संतुलित राखण्यासाठी विविध फळांचा आहार घेणे गरजेचे आहे. तसेच कॅन्सर, मधुमेह असे बरेच आजार आहेत या आजारांवर मात करण्यासाठी रंगीबेरंगी फळभाज्या तसेच फळे खावीत.

Updated on 04 March, 2022 2:27 PM IST

१. काळी द्राक्षे :-

तुम्ही जास्त करून बाजारातून हिरवी द्राक्षे आणता मात्र तुमचे कॅन्सर पासून जर सरंक्षण करायचे असेल तर काळी द्राक्षे खाण्यास सुरू केले पाहिजे. काळ्या द्राक्षात सुपर अँटीऑक्सिडंट ऍक्टिनने भरलेल्या बिया असतात. रेड वाईन असो किंवा लाल द्राक्षचा ज्यूस आहे त्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते सुद्धा कर्करोग, हृदयरोग आणि इतर जुनाट आजारांपासून आपले सरंक्षण करतात.

२. ब्रोकोली :-

कॅन्सरच्या प्रतिबंधनासाठी ब्रोकोली, बेरी आणि लसूण या सारख्या पदार्थांची प्रमुख भूमिका आहे. ब्रोकोली, बेरी तसेच लसूण या पदार्थामध्ये कॅलरीज तसेच फॅट कमी असते. कॅन्सर चा धोका फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट या गुणधर्मांमुळे कमी होतो. ब्रोकोली ही भाजी तुम्ही आहारासाठी उकळून घ्यावी.

३. मासे :-

सॅल्मन, ट्यूना आणि हेरिंग या सारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड चे प्रमाण असते जे की हे फॅटी ऍसिड कॅन्सरवर उपचार म्हणून वापरले जाते. मात्र त्यासाठी तुम्हाला मासे खाणे गरजेचे आहे कारण मासे हे कॅन्सरविरोधी चांगले लढा देतात. तसेच तुम्ही ओमेगा -3 या गुणधर्मसाठी फ्लेक्स सीड्स सुद्धा खाऊ शकता.

४. लसूण व कांदा :-

लसूण आणि कांदा हे आपल्या शरीरात तयार होणाऱ्या नायट्रोसामाइन्सच्या निर्मितीस विरोध करते. नायट्रोसामाइन्स हे कार्सिनोजेनिक घटक आहे जो आपल्या शरीरातील पोट, यकृत आणि स्तनांवर परिणाम करतात. मात्र लसूण, कांदा हे तिखट असले तरी ते कॅन्सर वर प्रतिबंधनात्मक उपाय आहे.

५. ग्रीन टी :-

ग्रीन टी च्या पानात कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट आहे जी आपल्या शरीरात असणारे फ्री रेडिकल्सपासून सरंक्षण करते आणि आपला कॅन्सरपासून बचाव होतो. ग्रीन टी मध्ये असणारे कॅटेचिन हे गुणधर्म ट्युमर ज्या पेशी असतात त्यांची वाढ कमी करते. तुम्ही रोज एक कप तरी ग्रीन प्यायला पाहिजे.

६. टोमॅटो :-

टोमॅटो मध्ये लाइकोपीन प्रकारचे अँटीऑक्सिडंट असते जे अतिशय शक्तिशाली आहे. बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ई पेक्षा लाइकोपीन हे अँटीऑक्सिडंट हे शक्तिशाली आहे. फुफुसच्या कॅन्सर विरोधात लाइकोपीन हे अँटीऑक्सिडंट काम करते. मात्र त्यासाठी तुम्हाला शिजवलेले टोमॅटो खावे कारण शिजवलेल्या टोमॅटो मधून लाइकोपीन बाहेर पडतो.

English Summary: These 6 foods are beneficial to prevent cancer, cow will get cancer in the first stage
Published on: 04 March 2022, 02:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)