दिवसभर जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यांना त्रासलेले आहेत तर ही पोस्ट तुमच्या साठि झोप पूर्ण न होणे आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.प्रमाणापेक्षा जास्त खाणे आपण आपला आहार हा थोडी भूक राखून घेतला पाहिजे म्हणजे आपण खाल्लेले अन्न व्यवस्तीत पचेल सुरवातीला जेवण कमी झालं असं वाटलं पण नंतर आपणास सवय लागून जाते.
पुरेसा व्यायाम न करणे आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी 30 मिनिटं वेगवेगळे व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. शरीरातील पेशी अधिक चांगल काम करतात तुम्ही दिवसभर उत्साही आणि आनंदी राहता.आहारात प्रथिनांचं प्रमाण कमीतुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दूधाचा वापर करायला हवा. प्रथिनांचा वापर करायला हवा. चीज, मासे, दही, योगर्ट शेंगदाण्याचा वापर आहारात करा. फास्ट फूड पचनासाठी जड असतं. ते खाणं टाळा. वेळेवर आहार घ्या.
*साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळासाखरेचं प्रमाण अति असणारे गोड पदार्थ तुम्हा वारंवार खात राहिलात तर तुम्हाला आळस येऊ शकतो. त्यामुळे दिवसभर मरगळलेले किंवा थकलेलं वाटू शकतं. साखरेचं प्रमाण कमी असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या.शरीरात लोहाची कमतरता आपल्या शरीरातील हिमोग्लोब्लीन किंवा रक्त कमी झालं तरीही आपण काहीही काम न करता आपल्याला दमल्यासारखं होतं. खूपदा डोकं दुखतं आणि चक्करही येते. त्यामुळे तुमच्या आहारात पालेभाज्या, हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी फळ, खाद्यपदार्थ खाणं आवश्यक आहे.
ताणतणाव कामाच्या ठिकाणी किंवा घरातही काही वेळ तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. गाणी ऐकणं, चित्र कारणं, फिरणे काहीही जे तुम्हाला आवडतं ते. ज्यामुळे तुम्हाला आलेला ताण कमी होईल. किंवा कामाच्या टेन्शनपासून काही वेळ स्वत:ला लांब ठेवा त्यामुळे तुमचा मूड फेश होईल आणि अधिक जोमानं काम करू शकाल.
Nutritionist & Dietician
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Published on: 07 May 2022, 07:32 IST