Health

गुडघेदुखी ची समस्या वयोवृद्ध लोकांमध्ये जास्त प्रमाणात असते,असे म्हटले जायचे. परंतु आता वयाची तिशी पार केल्यानंतर बऱ्याच जणांना गुडघेदुखीची समस्या उद्धवते. गुडघेदुखीवर डॉक्टरांकडे जाऊन उपचार केले जातात तसेच बराच काळपर्यंत औषधे घेऊनही फारसा आराम मिळत नाही.

Updated on 14 December, 2021 1:52 PM IST

गुडघेदुखी ची समस्या वयोवृद्ध लोकांमध्ये जास्त प्रमाणात असते,असे म्हटले जायचे. परंतु आता वयाची तिशी पार केल्यानंतर बऱ्याच जणांना गुडघेदुखीची समस्या उद्धवते. गुडघेदुखीवर डॉक्टरांकडे  जाऊन उपचार केले जातात तसेच बराच काळपर्यंत औषधे घेऊनही फारसा आराम मिळत नाही.

असाच अनुभव कित्येकांना येतो. परंतु असे काही घरगुती उपाय आहेत जे करून या त्रासापासून मुक्तता मिळू शकते. या लेखात आपण गुडघे दुखीवर उपयुक्त करू शकणारे काही घरगुती उपाय जाणून घेऊ.

 गुडघे दुखी वर घरगुती उपाय

  • सफरचंदाचा रस- जर तुम्ही एक चमचा सफरचंदाचा रस पाण्यात घालून नियमितपणे पिला तर गुडघ्यांचेदुखणे दूर पळते.
  • बर्फ- जर गुडघे दुखत आहेत व ते सुजलेले आहेत तर त्यासाठी एका टॉवेल मध्ये बर्फाचे तुकडे आणि दुसर्‍या जागेवर दहा ते पंधरा मिनिटे रगडा. असे केल्याने गुडघे दुखी पासून आराम मिळतो.
  • ढोबळी मिरची- लाल किंवा काळ्या रंगाची ढोबळी मिरची या दुखण्यावर औषध आहे.त्यांचे सेवन केल्याने गुडघे दुखणे कमी होते असा तज्ञांचे म्हणणे आहे.
  • आले- आल्याचा काढा गुडघेदुखीवर रामबाण ठरतो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आल्याचा काढा नियमितपणे घ्यावा.पेशींना काही दुखापत झाली असेल तर त्यावरही हा उपाय परिणामकारक आहे.
  • हळद- नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अंड अल्टरनेटिव्ह  मेडिसिन मध्ये आलेल्या माहितीनुसार हळद गुडघेदुखीवर परिणाम करते. हळद सांधेदुखीवर ही प्रभावी आहे. गरम दूधात हळद टाकून प्यायला तर नक्कीच आराम पडतो.
  • व्यायाम- गुडघेदुखीवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमितपणे व्यायाम करावा.
  • गरम पाणी- गरम पाण्याने शेक दिला तरीही फरक जाणवतो.

टीप- कुठलाही औषधोपचार करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

English Summary: the useful homemade remedy in knee pain that useful for that
Published on: 14 December 2021, 01:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)